Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, पहा किती कोटीची तरतूद

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे 3 जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी योजना बनली आहे या योजनेमुळे माहयुती सरकारला मोठे यश आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ मिळतो लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झाले आहे.
लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे 13500 जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता एप्रिल महिन्याचा 10 व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye Out )

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
La9tcOcy Hw HD 1

एप्रिलचा हप्ता

लाडकी बहिण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला होता परंतु आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण की कालपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांना एप्रिलचे 1500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

लाडकी बहिण योजनेमध्ये आता फक्त एप्रिलचा हप्ता हा ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांना मिळणार आहे कारण आतापर्यंत सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जवळपास संपत आलेली आहे आणि ज्या महिला या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत त्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्या महिलांना 1500 रुपये चा लाभ मिळणार आहे उर्वरित महिला ह्या पूर्णतः एप्रिल महिन्यापासून या योजनेतून बाद होणार आहेत.

Ladkii bahin april hapta

या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार

लाडकी बहिण योजनेमध्ये काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना 500 रुपये मिळणार आहेत त्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनाच 1500 रुपये मिळणार आहेत परंतु ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेता येते त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत तसेच नमो शेतकरी योजनेत महिलांना 1000 रुपये दिले जातात प्रति महिना त्यामुळे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतील 1500 आणि नमो शेतकरी योजनेतील 1000 या दोन्ही मधील फरक म्हणजेच फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत.
जवळपास 7 लाख 74 हजार 148 अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत कारण या सर्व महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत हे असे निर्देशनास आले आहे आणि ही आकडेवारी पण अधिकृतपणे महिला व बालविकास विभागाने कळवली आहे.

april hapta 1500 rs

एप्रिलचा हप्ता आदिती तटकरे

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्व लाभार्थी पात्र महिलांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार त्यानुसार काल 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे लवकरच ते दोन-तीन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँका त्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे.Ladki Bahin Yojana April Installment 1500

एप्रिलचा हप्ता वितरणासाठी 3960 कोटीची तरतूद

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे कारण का अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती राज्य सरकारकडून 3960 कोटी रुपयांची एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे ही रक्कम महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे आता एप्रिलचा हप्ता हा 72 तासाच्या आत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
ज्या महिला निकषांमध्ये बसत आहेत आणि त्यांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच पात्र महिलांनाच एप्रिल महिन्याचा दहावा आत्ता 1500 रुपये जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, पहा किती कोटीची तरतूद”

Leave a Comment