महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अधिकृतपणे सुरू केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती पुन्हा निवडून आल्यास पात्र महिलांना देण्यात येणारी मासिक आर्थिक मदत १५०० रुपयांवरून ३००० रुपयांपर्यंत दुप्पट करण्याचे संकेत दिले आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. याची अंमलबजावणी झालीच, तर पाच वर्षांत राज्याच्या तिजोरीवर तब्बल 4 लाख ६० हजार कोटींचा बोजा पडेल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार आणि पर्यायाने कर्जाचा बोजा वाढणार आहे.
लाडकी बहीण’ योजनेत सुमारे २ कोटी लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपये गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात वर्षाला ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय लाभार्थींची संख्याही दोन कोटींपेक्षा अधिक होण्याचीही शक्यता आहे. रक्कम दुप्पट झाल्यास वर्षाला ९२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे. योजना पाच वर्षे सुरू राहिल्यास ही रक्कम थेट चार लाख ६० हजार कोटींच्या घरात जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात राजकोषीय तूट एक लाख १० हजार कोटी रुपयांवर तर कर्जाचा बोजा सात लाख ८२ हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्यात आता लाडकी बहीण योजनेच्या या ‘ओवाळणी’मुळे तिजोरीवर आणखी ताण येणार आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
आम्ही फॉर्म अर्धा महिना होईल आता, पण अजून ही पेंडिंग आहे.. इंडिया पोस्ट पयमेन्ट बँक मध्ये नाही येत तर कोणत्या बँकेत येतात?
Jyanna milale tyanna milale aatta kahi yojne cha laabh bhetnar naahi jyanna jast garaj aahee tyanna nahi aalet aani jyanchyakde sarv asun aalet wah re sarkar
आधार कार्ड नोंदणी बँकेशी नसेल तर पैसे जमा नाही होणार का.?
माझे बॅक अकाउंट दिले होते त्यावर जमा न होता दुसर्याच अकाउंटला पैसे जमा झाले . मला त्यामुळे 1000 तर डेबिट पडलाय. मला खात चेंज करून घेण्यास काय कराव लागेल???