Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींचं 7500 रूपयांच झालं नुकसान!अर्जाची मुदत संपली

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th&5th Installment News Update :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे 2 कोटी 30 लाख ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाली आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बैंक खात्यात महाराष्ट्र सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज तर मंजूर झालेले आहे व त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक पण आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही.
अशा सर्व महिला चिंतेत आहे की आम्हाला या योजनेची लाभ मिळणार का नाही ?

Ladki Bahin Yojana Last Date :

mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme :

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोंबर 2024 ला होती. या मुदतीतही अनेक महिलांना योजनेत अर्ज करता आला नाही. आणि आता राज्यात निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागली आहे. अशा अवस्थेत योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याचीही शक्यताही कमी आहे. त्यामुळे ज्या महिला अजूनही अर्ज करू शकल्या नाहीयेत त्या महिलांचे 7500 रूपयांचे नुकसान झालं आहे. (ladki bahin yojana these women did not get 7500 installment amount because the file application in mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar)

सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ठरवण्यात आली होती. मात्र 31 जुलैपर्यंत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. तसेच सरकारी कार्यालयातील रांगा आणि दाखल्यासाठीची धडपड पाहता सरकारने योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाता होता.

majhi ladki bahin yojana last date to apply,

Ladki Bahin Yojana Last Date :

Ladki Bahin Yojana आता 31 ऑगस्टनंतर देखील अनेक महिला या योजनेत अर्ज करण्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे सरकारने पुन्हा महिन्याभराची म्हणजेच 30 सप्टेंबरची मुदत वाढवली होती. या मुदतीतही असंख्य महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतरही अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाच नव्हता. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत शेवटची असेल याचे संकेत आधीच मिळत होते. कारण राज्यात विधानसभा निवडणूक लागणार होती. त्यामुळे सरकार मुदतवाढ देण्याची शक्यता कमी होती. आणि आता तसेच घडताना दिसतेय. 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account

त्यामुळे ज्या महिला 15 ऑक्टोंबरपर्यंतही जर अर्ज करू शकल्या नाही आहेत. त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही. सरकारने आतापर्यंत पाच महिन्यांचा निधी म्हणजेच 7500 महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे ज्या महिला योजनेत अर्ज करू शकल्या नाहीयेत त्यांना मोठा धक्का बसला आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

9 thoughts on “Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींचं 7500 रूपयांच झालं नुकसान!अर्जाची मुदत संपली”

  1. maza form approved jhala ahe…ani bankela suddha adhar link ahe…Adhar la phone no suddha link asun dekhil mala ajun kontahi hafta alela nahi….

    Reply
    • Maza adhar link ahe mo.number sudha link ahe form sudha approve zalela ahe tari mazya hi account varti 1 k hi hafta alela nahi

      Reply

Leave a Comment