Ladki bahin yojana महाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची चर्चा सगळीकडे जोरात सुरु आहे. एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच काही गैरप्रकार होत असल्याचेही उघडकीस येत आहे.काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचे समोर आले होते. अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चक्क अर्ज भरल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हा सारा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये घडला आहे.
कन्नड तालुक्यामधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी केली जाते. बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पडताळणीदरम्यान हा प्रकार समजला.
बहीणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या १२ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसंच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता.सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणीदरम्यान हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
Mazi Ladki Bahin Yojana Official Website
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.