Ladki Bahin Yojana : आधार कार्ड बैंक खात्याशी कस लिंक करायच Aadhar Card Link to Bank Account

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

LADKI BAHIN YOJANA AADHAR CARD

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते.महत्वाची मंत्री लाडकी बहीण योजनेचे’ पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे.राज्य सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. कोट्यवधी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र अनेक जणींचं आधार कार्ड हए बँक अकाऊंटशी लिंक केलेलं नाही. हे बँक खातं आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं याची सम्पूर्ण माहिती आपण पाहुया.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे की नाही ? त्यासाठी काय करायच | AADHAR TO SEEDING PROCESS

1 . सर्वप्रथम गुगलवर जाऊन My Aadhar असे सर्च करायच .
2 . माय आधार च्या वेसबाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करायच .

SEEDING


3 . त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो टाका.
4 . ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
5 . खाली स्क्रोल केल्यावर ‘Bank seeding status’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायच .

ACTIVE STATUS


6 . तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, आणि तुमचं Bank seeding status हे “ॲक्टिव्ह” आहे की नाही ते दिसेल.
7 . बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं,तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते.

तुमचं आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक कसं करायच | AADHAR CARD LINK TO BANK ACCOUNT

1 . सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI (National Payment Corporation of India) असं सर्च करायच .
2 . npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
3 . होमस्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर ‘consumer’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायच .
4 . तेथे तुम्हाला Bharat Aadhar seeding हा पर्याय दिसेल , तेथे enable वर क्लिक करायच .
5 . नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार नंबर लिंक करायचा असेल तर त्यासाठी request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करायच .

NPCI Link Bank


6 . खाली तुमच्या कोणत्या बँकेचं अकाऊंट लिकं करायचं आहे, त्या बँकेचे नाव निवडा आणि fresh seeding ( नव्याने लिंक करण्याचा पर्याय) यावर क्लिक करावे लागेल.
7 . खाली तुम्हाला बँकेचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल.
8 . अकाऊंट नंबर कन्फर्म केल्यावर खाली काही टर्म्स आणि कंडीशन्स दिसतील, त्या पूर्ण वाचा आणि स्वीकारा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून ” proceed ” बटणावर क्लिक करावे.
9 . खाली पुन्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडीशन्स दिसतील. तिथे Agree and Continue करावे.
10 . नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी देखील टाकावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटसोबत लिंक करू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment