Ladki Bahin Yojana 15th Installment 1500 Out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला ई केवायसी करतील त्यांना त्यांची ई केवायसी झाल्यानंतर त्यांना सुरळीत हप्ते मिळतील असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिला ह्या दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आली आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरणासाठी महिला व बाल विकास विभागाकडे निधी प्राप्त झालेला आहे आणि त्याचा GR पण प्रसारित झाला आहे आता आपण पाहूया सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल आणि कोणत्या महिलांना याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana 15th Installment 1500 Out )

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहीण योजना अपडेट
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत पात्र महिलांच्या बँका त्यामध्ये 14 हप्त्याचे म्हणजेच ऑगस्टपर्यंतचे सर्व हफ्ते 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 21000 रुपये एवढी रक्कम जमा झालेले आहे आता सर्व पात्र महिला ह्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याच्यासाठी खुशखबरी आहे अशी की सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी लागणारा निधी हा महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झालेला आहे आणि तो सप्टेंबर महिन्याच्या हप्ता लवकरच दोन-चार दिवसांमध्ये वितरणा सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दिवाळीच्या अगोदर लाडक्या बहिणींची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या निधी वितरण
लाडकी बहीण योजनेमध्ये सप्टेंबर महिन्याच्या निधी वितरणासाठी राज्य सरकारला 410 कोटी रुपयाचा निधी विभागाकडे प्राप्त झाला आहे आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे लवकरच प्रसार माध्यमाची बोलून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरणाचा प्रक्रिया याबद्दल माहिती देतील.
लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरणासाठी लागणारा निधि हा सामाजिक विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे पाठवला जातो त्यानंतर महिला विभाग हा एक दोन दिवसांमध्ये तो प्राप्त निधी वितरित करण्यास सुरुवात करत असते त्यामुळे पुढील हप्त्यापासून सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यात सुरुवात होऊ शकते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी 410 कोटी रुपये चा निधी प्राप्त झालेल्या चा जीआर पण आलेला आहे.

ई केवायसी आवश्यक आहे
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आता महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेल्या ई केवायसी प्रक्रिया ही या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला बंधनकारक केलेली आहे.
या योजनेमध्ये आताही ई केवायसी करण्यासाठी विभागाने दोन महिन्याच्या कालावधी दिला होता परंतु लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट काही दिवस बंद असल्यामुळे लाखो महिलांना ई केवायसी करता आली नाही आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलानी ई केवायसी केलेली आहे त्या महिलांना 1500 रुपये आता येणार आहे आणि ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या महिलांना पण 1500 रुपये हप्ता येण्याची दाट शक्यता आहे कारण की राज्यातील सर्वात मोठा सण हा दिवाळी असल्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. लवकरच सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयेचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Error yetiey open ch hot nahi aahe OTP nahi yet
Sakali 4 vajta pan high traffic as a msg yeto
Otp yet nahi error hot ahe