Aditi Tatkare will be sifting the request
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झाला. पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. आता या योजनेबाबत येणाऱ्या ताज्या अपडेटमुळे काही महिलांचे टेन्शन वाढू शकते. काही महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लाभार्थ्यांना २१०० रुपये मिळणार का?Will the beneficiaries get Rs 2100?
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना सध्या दीड हजार रुपये मानधन दिले जाते. ते २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. आता या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याचे कसब महायुती सरकारला दाखवावे लागणार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आम्ही दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण केले जाईल. बजेटच्या वेळी तो विचार केला जाईल. आर्थिक स्त्रोतांचा विचार करुन हे सगळे करावे लागेल. लाडक्या बहिणीला 2100 रुपये हे 1 अप्रैल नंतर चा हप्त्या मध्ये येणार त्यांचा बैंक खात्यात जमा होतील.
छाननी होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे Women and Child Development Minister Aditi Tatkare will be scrutinized
या अर्जांची छाननी होणार का, या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या, सर्व अर्जांची छाननी झाली आहे. मात्र एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी करण्यात येईल. मी महिला व बालविकास मंत्री होते, त्यावेळी माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. आता नव्याने काही तक्रारी आल्या असतील तर मला माहीत नाही. मात्र तक्रारी आल्या असतील तर त्या अर्जांची छाननी होईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
Ladki Bahin Yojana नियम व अटी Rules and regulations
Ladki Bahin Yojana सरकारने काही नियम व अटी दिल्या होत्या व त्या अटींचे जर महिलांनी पालन केले नसेल तर त्यांची वसुली होऊ शकते व त्यांच्या वरती मोठा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहणे गरजेचे आहे. कोणकोणत्या नियम व अटी आहेत याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे…!
- कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
- कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)
Ladki Bahin Yojana काही अर्जाची छाननी केली जाईल-अदिती तटकरे Ladki Bahin Yojana – Any request will be scrutinized – Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana प्रारंभी कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांच्या बेगमीसाठी २१ ते ६५ वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी या दोन प्रमुख अटी होत्या. राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी ७ लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी ४७ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या १३ लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थींना डिसेंबरचा हप्ता देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.
दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. खऱ्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी, या उद्देशाने पुढील तीन महिन्यांत अर्जांची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. आता अर्जांची छाननी केली जाईल. त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केले जाईल.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
हे तर सगळ्यांना माहित होत गरज सरो आणि वैद्य मरो ही केवळ मत मागण्यासाठी ही योजना काढली होती का??
Nivadnuk sampali
Navin kadhi genar ahot
Dyaiche nastil mhanun matki chalu ahet. Election sample ata. Rang dakhavle sarvani.