Ladki Bahin Yojana apatra list
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेले सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जुलै महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु काही महिलांचे अर्ज अजूनही थकीत करून ठेवण्यात आलेले आहेत कारण सध्या अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील खूप महिलांच्या अर्जाची तपासणी चालू आहे त्यामुळे त्यांचे अर्ज आणि त्यांना जुलै महिन्याचा हप्ता थांबून ठेवण्यात आलेले आहे आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana apatra list )

चार चाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे आणि त्यामध्ये काही निकष ठरवल्याप्रमाणे त्यातील निकष ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्या महिलेला योजनेचा लाभ मिळू शकत नाही परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीमध्ये जवळपास 5942 महिला कडे चार चाकी वाहन असल्याचे समोर आले आहे नियमानुसार अशा लाभार्थ्यांचे अर्ज थांबवण्यात आलेले आहेत, विशेष म्हणजे 244 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे पण घेतले आहेत.

पडताळणीत गैरप्रकार दिसले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये महिला व बालविकास विभागाने पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून माहिती मागवली त्यामध्ये काही महिलांना राज्य शासनाच्या दोन सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे तर काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्याचे आढळले.
अनेक असे कारण जसे की उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे घरामध्ये चार चाकी वाहन असणे किंवा सरकारी नोकरीवर असून सुद्धा लडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत असे अनेक कारणे या योजनेमध्ये दिसून आले आहेत त्यामुळे या महिलांना अपात्र करण्यात येत आहे.
सध्या राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमधील अर्जाची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे अमलात आणली आहे जिल्हाधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे घरोघरी जाऊन तपासणी करत असून त्यामध्ये त्या महिलेच्या सर्व प्रकारची चौकशी करत आहेत त्यामध्ये त्यांच्या घरचे उत्पन्न, घरांमध्ये चार चाकी वाहन आहे का त्यांचे बँक खाते एकच आहे का असे सर्व निकष तपासले जात आहेत.

26 लाख महिलांना पैकी किती महिला पात्र आणि अपात्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला 2 कोटी 50 लाख महिला या योजनेमध्ये पात्र झाल्या होत्या परंतु या योजनेमध्ये खूप सारे गैरप्रकार दिसून आले त्यामध्ये जवळपास 26 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. परंतु खूप महिलांना जुलै महिन्याचा हप्ता अजून पण आलेला नाही.
त्या मागचे कारण असे की ज्या ज्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना ज्या महिलांचे अर्ज मध्ये काही गडबड आढळून आल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांचे अर्ज हे चौकशीसाठी थाम्बुन ठेवले आहेत त्यांची जोपर्यंत अर्जाची पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही अशा 26 लाख महिला पैकी आता किती महिला पात्र होतील आणि किती महिलांच्या अपात्र होतील हे काही दिवसांमध्ये कळेल. मागील जून महिन्याचा हप्ता पण जवळपास 26000 महिलांचा थकीत करून ठेवण्यात आलेला होता त्यांची पण पात्र आणि अपात्र यादी अजून पण जमा झालेली नाही हे सर्व अशा सर्व महिलांची चौकशी पूर्णपणे अंगणवाडी सेविका मार्फत पूर्ण होईल तेव्हाच त्यांना पुढील हप्ते जर पात्र असतील तर मिळतील नाहीतर त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.(Ladki Bahin Yojana apatra list )

हप्त्यांचे पैसे वसूल केले जाणार ?
लाडकी बहिण योजनेमध्ये 14000 हजार पुरुषानी महिलेच्या नावाने अर्ज दखल केले होते ते सर्व अर्ज थकित करुण ठेवले आहेत अन तय 14000 पुरुषवर करवाई पण होणार आहे असे स्पष्टपने मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस यांनी सांगितले होते आणि त्याना जो लाभ 12 हप्त्याचा भेटला आहे तो त्याचा कडून वसूल पण करू असे म्हटले होते. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांच्या पैशांचे काय होणार? सरकारने हे पैसे परत घेणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. जर सरकारने हे पैसे परत घेतले नाहीत, तर त्याचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर आणि पर्यायाने सामान्य जनतेवर पडेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Haptta aala nahi