लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी: जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा
Ladki Bahin Yojana 3000 July Installment : लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळण्यास सुरवात, किती रक्कम मिळणार जाणून घ्या : माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे! रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर, योजनेतील महिलांच्या बँक खात्यांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्षाबंधनाची खास भेट मिळाली आहे. Majhi Ladki Bahin Yojana 13 Hafta Update
जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचे ₹1500 देखील लवकरच जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे, योजनेच्या पात्र महिलांना आर्थिक मदत मिळण्याचा आनंद द्विगुणीत होणार आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
या महिलांना मिळणार ₹3000 चा विशेष हप्ता! |Ladki Bahin Yojana 13th Installment Release

ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा अर्जाच्या पडताळणीमुळे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळाले नव्हते, त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. अशा पात्र महिलांना या रक्षाबंधनापर्यंत एकूण ₹3000 (जून आणि जुलै महिन्याचे एकत्रित) हप्ता मिळणार आहे. या विशेष हप्त्यामुळे, अनेक बहिणींना एकाच वेळी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.Ladki Bahin Yojana July 13th Installment Release
हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे, महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेबद्दल अधिक माहिती किंवा तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. ‘माझी लाडकी बहीण’ योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Ladki Bahin Yojana Installment Not Received

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी ३० जून २०२४ रोजी सुरू झाली. या योजनेसाठी राज्य शासनाने काही निकष निश्चित केले होते. ज्या महिलांनी या निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, अशा महिलांचे अर्ज तपासले जाऊन त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. खालील ७ प्रमुख कारणांमुळे अनेक महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि त्यांना १५०० रुपयांच्या मासिक मानधनापासून वंचित राहावे लागत आहे: Ladki Bahin Yojana Payment Update
१. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त: ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळत नाही.
२. कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे: ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर (Income Tax) भरतो, ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरते. करदात्या कुटुंबांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळत नाही.
३. सरकारी नोकरीत असलेले कुटुंब सदस्य: कुटुंबातील सदस्य राज्य सरकार, केंद्र सरकार, किंवा कोणत्याही उपमंडळात (Sub-Corporation) कार्यरत असल्यास, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
४. इतर योजनांतून ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन: जर संबंधित महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल, तर त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. दुहेरी लाभा टाळण्यासाठी हा निकष लावण्यात आला आहे.
५. आमदार/खासदार असलेले कुटुंब सदस्य: सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार (MLA) किंवा खासदार (MP) असल्यास, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
६. बोर्ड/कॉर्पोरेशन/मंडळाचे सदस्य: ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड, कॉर्पोरेशन, महामंडळ (Corporation), किंवा उपमंडळाचे सदस्य आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
७. चारचाकी वाहन कुटुंबाच्या नावावर (ट्रॅक्टर वगळून): ट्रॅक्टर वगळता, ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन (उदा. कार, जीप) आहे, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात. हे उत्पन्न आणि आर्थिक सक्षमता दर्शवते.
वरील कारणांमुळे अनेक पात्र महिलांनाही त्यांचा हप्ता मिळाला नसावा. ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपल्या पात्रतेची एकदा पुन्हा पडताळणी करावी आणि वरील निकषांमध्ये बसत नसल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
Ladki Bahin Yojana Installment Payment Status Check

लाडकी बहिण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातूनच वितरित केला जातो तसेच ज्या पण महिलांना या महिन्याच्या ऑनलाईन पेमेंट स्टेटस पाहायचे आहे त्यांनी खालील गेलेल्या स्टेपच पालन करायचे आहे.
- ० PFMS या अधिकृत वेबसाईटवर जायचं
- ० त्यानंतर पेमेंट स्टेटस वर क्लिक करायचे आणि डीबीटी स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे
- ० त्यानंतर कॅटेगरीमध्ये येणे ऑदर एक्स्टर्नल सिस्टीम सिलेक्ट करायची
- ० त्यानंतर आपले आपलिकेशन आयडी टाकायचा
- ० त्यानंतर कॅपच्या कोड व्यवस्थित भरून सर्च या बटनवर क्लिक करायचे
- ० आता तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस दिसेल ते पाहायचे आहे.
Ladki Bahin Yojana जुलै पैसे कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता 9 ऑगस्ट पासून मिळण्यास सुरुवात होणार.
लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्यात किती रुपये हप्ता मिळणार?
लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्याच्या 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Ajun june julai che paise ale nahi
Ajun jun jhule Che paise Mala aale nahi
June July che peyese mla ata prynt nhi milale