Ladki Bahin Yojana Patra Mahilela 30-40 hajar rupaye karj milnar
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जून 2024 मध्ये सुरू केलेली महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेत अंतर्गत लाभार्थी महिलेस प्रति महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ जाते या लाभांमुळे महिलेचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि त्या महिलेस आर्थिक मदत सुद्धा मिळते आणि या दृष्टिकोनाने महिलाही स्वावलंबी बनू शकते. या योजनेतून महाराष्ट्र सरकारचा लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना
माझी लाडकी बहीण योजना मध्ये आतापर्यंत 10 हप्त्याचे वितरण पूर्णतः झालेले आहे. लाडक्या बहिणीला दहा हप्त्याचे प्रती महिना 1500 रुपये प्रमाणे महिलेच्या बँकाच्या मध्ये आजपर्यंत जमा झालेले आहेत त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हक्क हा लवकरच महिलांचे बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्याबद्दल अद्यापही माहिती अधिकृतपणे आलेली नाही.
या योजनेमध्ये जवळपास 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा लाभ घेत असतात म्हणून ही योजना महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठी योजना बनली आहे.

लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये काल नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यांमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठं भाष्य केले आहे आणि एक खुशखबर लाडक्या बहिणींना मिळाली आहे अजितदादा यांनी म्हटले आहे की लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज मिळणार आणि या कर्जाची परतफेड ही लाडक्या बहिणीच्या हप्ता मधून केली जाणार आहे या कर्जामुळे लाडकी बहिण स्वतःचा लघुउद्योग टाकू शकते आणि स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी तिला मदत होईल असे अजितदादानी म्हटले आहे.
लाडक्या बहिणीला 30 ते 40 हजार रुपयांचे कर्ज हे बँकांकडून मिळणार आहे त्यामध्ये काही बँका तयार सुद्धा आहेत कर्ज देण्यासाठी त्यामुळे हे कर्ज कधी मिळेल याबद्दलचा राज्य सरकार मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन विचार करणार आहे त्यानंतर कर्ज कधी मिळणार आहे स्पष्टपणे कळेल.

कोणत्या बँका मधून कर्ज मिळेल
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता पात्र महिलांना 30-40 हजार रुपयांचे कर्ज मिळणार असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केलेले आहे त्याने बोलताना म्हटले आहे की जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामीण बँक अशा अनेक बँकांकडून कर्ज मिळू शकते आणि ह्या सर्व बँक कशी राज्य सरकारचे बोलणे झालेले आहे आणि काही बँका स्वतःहून कर्ज देण्यास तयार आहेत.
लाडक्या बहिणींना जर तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळाले तर त्या महिलेला कोणताही लघुउद्योग टाकण्यास मदत होईल आणि ती महिला हे स्वावलंबी बनेल असे अजित दादा यांनी म्हटले आहे.

कर्ज बिनव्याजी असेल का
लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता आहे आणि हे कर्ज कधीपासून मिळणार हे अद्यापही अधिकृतपणे सांगितलेले नाही परंतु हे लवकरच लाडक्या बहिणीसाठी कर्ज मिळण्याची शक्यता आहे सध्या नांदेड मधील एका भाषणांमध्ये अजित दादा पवार यांनी लाडक्या बहिणीसाठी कर्ज मिळणार ही खुशखबर दिलेली आहे परंतु हे कर्ज कोणत्या पद्धतीने असेल आणि या कर्जामध्ये व्याज लागणार आहे का किंवा हे कर्ज बिनव्याजी असेल का याबद्दल काही स्पष्ट झालेले नाही परंतु लवकरच राज्य शासन आणि महायुती सरकार याबद्दल निर्णय घेईल आणि लाडक्या बहिणींना काही वेळानंतर कर्जाबद्दल माहिती स्पष्ट होईल.

कोणत्या लाडक्या बहिणीला कर्ज मिळणार
लाडकी बहीण योजना मध्ये आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे पात्र महिलेला 30 ते 40 हजार रुपयांचे वार्षिक कर्ज बँकेकडून मिळणार आहे त्या कर्जासाठी महिलेला कोणते निकष लागू असतील हे अद्यापही सांगितलेलं नाही परंतु सूत्राच्या माहितीनुसार जी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे म्हणजेच जी महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णतः बसते त्याच महिलेला तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. लाडकी बहीण योजनामध्ये आतापर्यंत ज्या महिलेला 10 हप्ते ते पूर्णपणे 1500 रुपये प्रति महिना ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत ती महिला या कर्जासाठी पात्र असेल आणि त्या महिलेचे कर्जाची परतफेड ही आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमधून केली जाणार आहे राज्य सरकार डायरेक्ट बँकेला कर्जाची परतफेड म्हणून हप्त्याचे 1500 रुपये जमा करणार आहे. परंतु अजून कोणते निकष राज्य सरकार लावेल का किंवा अजून कोणत्या अटी या कर्ज मिळवण्यासाठी असतील याकडे महिलांमध्ये संभ्रम आता पण आहे.