Ladki Bahin Yojana April 1500 Installment Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणात सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 2 मे पासून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये एप्रिलचा हप्ता जमा होत आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता 1500 रुपये दोन तीन टप्प्यांमध्ये जमा होत आहे कारण की दोन मे रोजी जवळपास 50 लाख महिलांचा बँका त्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सोमवारपासून जवळपास 1 कोटी महिलांच्या बँकांच्या मध्ये एप्रिलचा हप्ता जमा करण्यात आला आहे त्यानंतर आता ही प्रक्रिया अजून पण चालूच आहे.

एप्रिल महिन्याचे 1500 रुपये हप्ता हा अजून पण महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे जवळपास एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2 कोटी 30 लाख महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कारण की यामध्ये मागील हप्ता हा फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता 3000 रुपये हा 2 कोटी 41 लाख महिलांच्या बँक खात्या जमा करण्यात आला होता परंतु आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा किती महिलांच्या बँक खात्यात जमा होईल आणि या महिन्यांमध्ये किती महिला अपात्र झाल्या आहेत हे निष्पन्न होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे अकरावा हप्ता वाटप लाडक्या बहिणीसाठी खुशखबर याबद्दल माहिती घेउया.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मंत्री संजय शिरसाट का्य टिका केली
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये Ladki Bahin Yojana विधानसभेच्या निवडणुकीत अगोदर माहयुती सरकारने 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती परंतु त्यानंतर 5 हप्त्याचे वितरण झाले तरी पण महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत 2100 रुपये चा हप्ता सुरू केलेला नाही त्यानंतर मार्चमध्ये बजेटमध्ये पण हे 2100 रुपयाचे काही तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे आता विरोधात माहयुती सरकारवर टीका करत आहे काल मंत्री संजय शिरसाठ यांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हप्ता होणे हे शक्यच नाही.

प्रति महिना 300 कोटीची तरतूद
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये वर्षाभरासाठी 3600 कोटीची तरतूद करण्यात आली होती परंतु हे पैसे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला भेटत असतात त्यामुळे आता प्रति महिना लाडक्या बहिणींना 300 कोटीची गरज पडत आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्ये देण्यात येत आहे आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आता प्रश्न पडलाय तो मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 300 कोटीची मागणी केलेली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे वितरण झालेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्त्याच्या वितरणासाठी आतापर्यंत राज्य सरकारला 3200 कोटी रुपये खर्च झालेला आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online

मे महिन्याचा हप्ता कधी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 10 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे आता एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा दोन मे पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana )
एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास पण विलंब झाला आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये जमा होत आहे तर आता मे महिन्याचा हप्ता हा लवकर जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सूत्राच्या माहितीनुसार आणि प्रसार माध्यमांवरील पोस्टमध्ये असे दिसत आहे की मे महिन्याचा हप्ता हा 15 मे पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे या त्यांच्या पोस्ट वरती अजून अपडेट दिलेली नाही आणि राज्य सरकारने पण असे सांगितले नाही.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
May month chi installment kdhi yeil please 🙏 lavkar dya