Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra Eligibility Criteria in Marathi
Mukhyamantri Annapurna Yojana Apply online :महाराष्ट्र शासनाने गेल्या अर्थ संकल्पात महिलांसाठी घोषणाच्या पाउस पाडला, लाडकी बहीण योजना असो पिंक आटो रिक्शआ योजना असो की मोफत तीन सिलेंडर योजना मुख्यमंत्र्यांनी जणू महिलांसाठी योजनाच्या धडाका लावलेला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना दरवर्षी मोफत तीन सिलेंडर देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे. तर जाणून घेऊया मुख्यमंत्री अन्नपूर्णा यांच्या अंतर्गत कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अर्ज कसा करावा व कधी मिळणार मोफत गॅस सिलेंडर शेवट पर्यंत वाचावे.
काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना |Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra gr Pdf
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील 52 लाख पात्र कुटुंबाला दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा या योजनेमध्ये शासनाने केली आहे. या योजनेत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षांमध्ये तीन सिलेंडर देण्याची योजना सरकारने आखलेली आहे. तुम्ही कुठल्या कंपनीचे सिलेंडर वापरत असाल तरी तुम्हाला या योजनेच्या लाभ मिळेल असे सरकारने नमूद केले आहेत.
कोणत्या कुटुंबाला मिळणार मोफत तीन सिलेंडर | Annapurna Yojana Ration Card
गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती मूळे शासनाने दरवर्षी पात्र कुटुंबांना 3 सिलेंडर मोफत मध्ये देण्याच्या निर्धार केलेला आहे, या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे, पांढरे राशन कार्ड असणाऱ्या राशन कार्ड धारकांना ज्या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कशी मिळणार तीन सिलेंडर मोफत
तुम्हाला तीन गॅस सिलेंडर वर्षाला कसे मिळणार याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असेल परंतु तुम्हाला मिळणारा सिलेंडर तुम्हाला त्याच भावात स्वतः घ्यायच्या आहे, नंतर तीन सिलेंडरची जेवढे पैसे होतात ते सबसिडी म्हणून तुमच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा केली जाईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पात्रता | Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra Eligibility Criteria
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंब हा महाराष्ट्राच्या रहिवासी असावा.
- पात्र कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असावी.
- अधिवास प्रमाणपत्र असावे
- परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.