Ladki Bahin Yojana update news
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामधील लाभार्थी महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे का आले काल एका भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे त्यांनी असे म्हटले की लाडक्या बहिणी जा निकषांमध्ये बसत नाहीत त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात यावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही सुरू करण्यात आली होती. आणि महिलांना आर्थिक कौटुंबिक मदत आणि महिला सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली होती. ही योजना जून मध्ये 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेमध्ये सहा हप्ते 1500 रुपये प्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता फक्त सातव्या हफ्त्याची म्हणजे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
Ladki Bahin Yojana कोणत्या तक्रारी आल्या आहेत
लाडकी बहिण योजनेतील काही महिलांच्या अर्जाची तपासणी केली असता त्यांचा तक्रारीवरून असे लक्ष्यात आले आहे की खूप महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असून सुद्धा त्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतला आहे. काही महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन सुद्धा असून त्यांनी पण या योजनेमध्ये लाभ घेतला आहे ह्या अशा तक्रारीमुळे आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही निकष लावण्यात येणार आहेत.
आणि त्यामध्ये ज्या महिलांचे यांनी निकष बसणार नाहीत त्या महिलांना यापुढील हप्ते वितरित होणार नाहीत. काही मुलांचे महिलांचे बँक अकाउंट वरचे नाव वेगळे आणि आधार कार्ड वरील नाव वेगळे अशा पण काही तक्रारी पडताळणीमध्ये निदर्शनास आले आहे. पण माझी लाडकी बहीण योजनेतील जीआर मध्ये कोणताही बदल केलेला अजून पण नाही.
काल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेवर बोलताना त्यांनी असे म्हटले की ज्या महिला अशा नावे तक्रारी आले आहेत त्यांच्याकडून दंडासहीत पैसे वसूल केले जाणार का किंवा त्यांना या योजनेतून वगळणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
Ladki Bahin Yojana छगन भुजबळ यांनी काय म्हटले
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गरीब कुटुंबासाठी व गरीब महिलांना आर्थिक मदत किंवा त्यांना सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ हा गरीब कुटुंबातील महिलांनाच मिळावा यासाठी ही योजना प्रतिमा पंधराशे रुपये देत झालेली आहे परंतु या योजनेमध्ये खूप महिलांनी त्यांच्या घरी चार चाकी गाडी असताना सुद्धा किंवा त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिला या योजनेमध्ये किंवा या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत त्यामुळे त्यांनी आपले या योजनेतील नाव हे स्वतः काढले पाहिजे किंवा त्यांना राज्य सरकारने या योजनेतून बात केले पाहिजे नाहीतर सरकारने अशा महिलांना आतापर्यंतचा लाभ दिलेला आहे तो लाभ परत घ्यावा असेही त्यांनी काल स्पष्टपणे सांगितले.
Ladki Bahin Yojana सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे
या योजनेंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना एकूण ₹ 9000 ची रक्कम मिळाली आहे. मात्र, जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. काही प्रशासकीय प्रक्रियेमुळे हा विलंब झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र 15 जानेवारीपूर्वी हा हप्ता मिळणे अपेक्षित आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala Arjun hi paise aale nahi ladki bahin Yojana Che ladki Yojana ke paise aale nahi huzoor kdhi yateem January