Ladki Bahin Yojana Status
महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत .खरं तर योजनेची घोषणा झाल्यानंतर 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र कागदपत्राअभावी अनेक महिलांना जुलै आधी अर्जच करता आला नव्हता. त्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते. त्यामुळे या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये आले आहेत.
त्याचसोबत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणीच्या रूपात 3000 रूपये आले होते. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा एकत्रित लाभ मिळाला होता.त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरचे पैसे येणे बाकी होते. म्हणजेच 1500 रूपये येणार आहेत. बँकेने हे पैसै पाठवले आहेत.
ladki bahin yojana aadhar seding update status – Aditi Tatkare
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्यात अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून, सप्टेंबरअखेरपर्यंत दोन कोटी ५२ लाख जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे २३ लाख ४० हजार महिलांनी बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडला नसल्याने त्या बहिणी लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली. त्याची गंभीर दखल घेऊन या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आधार’ क्रमांक ‘सीडिंग’ करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. त्यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव आणि जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी अधिकाऱ्यांना मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी सूचना दिल्या. ‘सेविकांना घरी पाठवा’ सप्टेंबरअखेर राज्यात 2 कोटी ५२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ इतक्या अर्जाना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २३ लाख ४० हजार महिलांनी अद्याप त्यांचे बँक खाते आधार क्रमाकांशी जोडले नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन ज्या महिलांनी बँक खाते आधार क्रमाकांशी जोडले नाही त्या लाभार्थ्यांना बँकेत जाऊन आधार क्रमांक जोडण्याच्या सूचना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना त्यांच्या घरी पाठवा.
बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या लाभाथ्यांना अंणगवाडी सेविकांनी प्रोत्साहित करावे, अशी सूचना तटकरे यांनी केली. ‘बँकावर कारवाई करू’ ‘ज्या लाभार्थ्यांच्या खात्यातून रक्कम जमा होताच बँकेकडून ती हप्त्यापोटी कापून घेतली जात असेल; तसेच लाभाथ्यर्थ्यांना ती रक्कम काढता येत नसल्यास अशा बँकांबाबत माहिती द्या. त्या बँकांना तंबी द्या. त्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल,’ अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी अधिकाऱ्यांना दिली.
राज्यातील Ladki bahin yojana लाभार्थी आणि मंजूर अर्जाची संख्या
जिल्ह्यांची नावे -अर्जाची संख्या- मंजूर अर्ज
पुणे 1976520-1904753
रायगड 588246 – 569035
सांगली 737543 – 703964
नगर 1204577 -1157899
छत्रपती संभाजीनगर 955750 – 901276
ladki bahin yojana आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते आधार कार्डशी लिंक केले
ईमेल आयडी
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
बोगस लाभार्थी शोधा
राज्यातील विविध भागांत बोगस लाभार्थी आढळत आहेत. त्याचा संदर्भ देऊन खासगी केंद्रावर कोठून अर्ज भरला आहे त्या केंद्रावरील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही महिला व बाल विकासमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana Official Website
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
माझे पैसे नाही आले अजून
me aarj kela hota july mahenayt tar pisce aleay oct madaye
tay pan 1500 rupay aalya
Pasa nahi ala Your application no NANA102925758 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
Ak pan rupaya nahi batla Your application no NANA102925758 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे पण मला अजून पैसे आले नाहीत
Me pn August mdhe form bharla , approve pn zala ,pn paise aale nahi
Me pn August mdhe form bharla , approve pn zala ,pn paise aale nahi ,
I hv not recvd any amount
Sagale aale 3 manth
Thank you so much 🙏