Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : लाडक्या बहीणना दर महिना मिळेल 1500 रुपये

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Table of Contents

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply :महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणा केली. योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना देण्याचे निर्धार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. ही घोषणा होताच सरकारी कार्यालय व सेतू केंद्रात महिलांची एकच गर्दी बघायला मिळाली, ही गर्दी कमी करण्या साठी महाराष्ट्रतील शिंदे सरकारने ऑनलाईन लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरण्यासाठी नारीशक्ती दूत हा ॲप गुगल प्ले स्टोअर वर लॉन्च केलेला आहे. तरी सरकारने सर्व महिलांना या ॲपद्वारे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरावा ही विनंती केली आहे, तर आपण बघूया की कसा आपण घरबसल्या नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड करून आपण आपला अर्ज घरबसल्या भरू शकता .

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही ऑफलाइन पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट आणि नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून ऑनलाइन अर्ज करू शकता. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 57 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

नारी शक्ती दूत ॲप मघून घरबसल्या करा अर्ज| Ladki bahin yojana online form kasa bharava

1.सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करायचा आहे.
2.नारीशक्ती दूत ॲप ओपन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी देऊन टर्म अँड कंडिशन वर क्लिक करून लॉगिन करायचं आहे.

NARISHKTI


3.तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीच्या प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट सदस्य, गृहणी आणि ग्रामसेवक या गोष्टी भरून आपला प्रोफाइल आपण अपडेट करायचा आहे.
4.नारी शक्ती दूत ॲप मध्ये लॉगिन केल्यावर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्याय दिसेल तो निवडायचे आहे.
5.नारी शक्ती दूत ॲप ला लोकेशनची परमिशन द्यायची आहे.

LOGIN


6.नंतर तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या अर्ज येईल.
7.लडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये आपल्याला आधार कार्ड प्रमाणे आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, आधार कार्ड क्रमांक व तुम्ही शासनाच्या कोणत्याही अतिरिक्त 8.योजनेचा लाभ घेतला असेल याची सविस्तर माहिती भरायची आहे.

CAPTCHA


9.तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण नाही या पर्यायावर क्लिक करा .
10.वैवाहिक स्थिती काय त्याच्याबद्दल माहिती टाका.
11.लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा तुमच्या जन्म पर प्रांतात किंवा महाराष्ट्र वगळता इतर कोणत्या राज्यात जन्म झाला असेल तर नाही किंवा हो या पर्यायावर क्लिक करा.

NARI DOC


12.त्यानंतर ज्या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत.
कागदपत्रे मध्ये आपल्याला आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचे दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, अर्जदाराचे हमी पत्र, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे आपल्याला लाडकी बहीण योजना यामध्ये अपलोड करायची आहे.
13.हे सर्व प्रक्रिया झाल्यावर अर्जदार महिलांनी आपला फोटो काढून ई केवायसी करायची आहे आणि एप्लीकेशन फॉर्म ला सबमिट करायचे आहे.

nari last pic


14.त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली सर्व कागदपत्रे एकदा तपासून त्यानंतर खात्री करूनच तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे आता एक ओटीपी नंबर आपण व्हेरिफाय करून घ्या.
15.अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरल्या मोबाईल मध्ये भरू शकता.

कसा भरायचा नवीन फॉर्म ? 

नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाई ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. तसेच जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर ती निवडा. नसेल तर लागू नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply : लाडक्या बहीणना दर महिना मिळेल 1500 रुपये”

Leave a Comment