Mukhymantri Annpurna Yojana mofat 3 gas cylinder eligibility criteria मोफत गॅस सिलेंडरसाठी कोण पात्र
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सरकारने योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये सरकारने मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना आहे याचा जीआर गव्हर्मेंट ने जाहीर केलेला आहे यामध्ये कोणत्या कुटुंबांना आहे या योजनेचा लाभ मिळेल. देशातील महिला ंना गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे एक सिलेंडर संपल्यानंतर दुसऱ्या सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत महिला काही साधन उपलब्ध नसल्यामुळे तेव्हा महिला वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली यामुळे सरकारने या देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरण मध्ये जगता यावे या उद्देशाने देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच कुटुंबातील महिलांना आरोग्य सुधारणा करून स्त्रियांचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने महाराष्ट्र केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली.
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सन 2024 -25 या वर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे यामध्ये राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पण तीन गॅस सिलेंडर मिळतील हा निर्णय शासनाने घेतला आहे.
mukhyamantri annapurna Eligibility criteria लाभार्थी पात्रता:
१.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे .
२.राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले 52 लाख 16 हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील .
३.मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंबांना पण सदर योजना पात्र असेल .
४.एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
५.14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडर साठीच ही योजना पात्र असेल.
योजनेची कार्यपद्धती:
१.राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत तीन मोफत असल्याचे वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल.
२.सदर योजनेत ग्राहकाला एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
३.या योजनेत तीन सिलेंडर नंतर प्रत्येकी सिलेंडर 830 रुपये याप्रमाणे रक्कम घेण्यात यावी.
४.या योजनेस पात्र उमेदवार हा १ जुलै 2024 रोजीच्या अगोदरचा असावा.
५.१ जुलै 2024 नंतर चा जर गॅस कनेक्शन असेल तर तो उमेदवार या योजनेस पात्र राहणार नाही.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.