Ladki Bahin Yojana updated News
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा Ladki Bahin Yojana चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री मुक्ताईनगरमध्ये काय म्हणाले?
Ladki Bahin Yojana एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गुलाबराव पाटील साहेब आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या, वीस नोव्हेंबरला विरोधकांच्या बुडाखाली फटाके फोडायचे आहेत. 23 नोव्हेंबरला ऑटोम बॉम्ब फोडायचा आहे. चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पाच हजार कोटींचा निधी दिला आहे, असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.कोणिही ही योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांना आपण पैसे देवू लागलो आहोत, सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, त्यामुळे नुकसान झालं तर त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. चंद्रकांत पाटलांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीची लीड मिळाली पाहिजे, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना विजयी करा, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
Ladki Bahin Yojanaमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. तसेच सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kahi milae nahi ata acharsahita pan lagu jalay diwali karta yenar nahi bahutek mala fakta 4500 milale atat paryant
Hafta pan nahi aani bonus pan nahi
Sir mein ne form nahi bhara hai next date kad chalu hoga
Ekahi hafta ala nahi.
Denar ahat ki nahi nakki.
maza pn from riject zala aahe durushti sahathi opsen dya sar pilij