Ladki Bahin Yojana Stipend Reduction Maharashtra
Ladki Bahin Yojana Stipend Reduction Maharashtra: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्यात येते, या योजनेमध्ये राज्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला, ही योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे.
या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापना करण्यात खूप मोठी मदत झाली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.50 कोटी महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी अर्ज निकषा बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतला आहे, अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे यामध्ये सुमारे लाखो महिला अपात्र ठरणार आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
या जिल्ह्यात तब्बल 27 हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र | Ladaki Bahin Yojana Today’s Update

लाडकी बहीण योजना राबवताना राज्य शासनाने काही निकष निश्चित केले होते या निकषाच्या बाहेर जाऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेत लाभ घेतला आहे. अशा महिलांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 7 लाख 19 हजार 880 महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी 6 लाख 563 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या.
या लाभार्थ्यांना आतापर्यंत 9 हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, परंतु बँक आधार कार्ड लिंक केल्यामुळे काही श्रीमंत लाडक्या बहिणीचे बिंग फुटले यातून 27 हजार 313 लाभार्थी महिला ठरल्या अपात्र असून या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे.
या लाडक्या बहिणीकडे शेती, घर, चार चाकी गाडी, सरकारी नोकरी, दुकान असल्यामुळे या लाडक्या बहिणीला या योजनेतून बाहेरच्या रस्ता दाखवण्यात आलेला आहे, आधार कार्ड लिंक झाल्यानंतर या सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे.
या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana Installment Date

लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करून ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या लाभ मिळत आहे अशा 8 लाख लाडक्या बहिणीला या योजनेत 1500 रुपये वरून फक्त 500 रुपये हप्ता मिळणार आहे अशी मोठी बातमी समोर येत आहे. याबद्दल अधिक माहिती देताना महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सांगितले की “शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana April 10th Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना ९ हफ्ते त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आता सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष एप्रिल महिन्याच्या दहाव्या आपल्याकडे लागलेला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला एप्रिलच्या हप्ता अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यचा हफ्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana April Hafta
लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याच्या 10वा हप्ता 25 एप्रिल पासून ते 30 एप्रिल च्या मध्ये कधी पण त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यत किती हफ्ता येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्यत 1500 रूपए हफ्ता येणार.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट ?
लाडकी बहीण योजनेची https://ladakibahin.maharashtra.gov.in ही वेबसाइट आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
7,8,9,10,कदी येणार पैसे