Ladki Bahin Yojana October Hapta Out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 1500 रुपय् लाभ बँक खात्यामध्ये डीबीटी च्या मार्फत दिले जातात.
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांना 15 व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाले आहेत त्यांना आता 16 व्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana October Hapta Out )

लाडकी बहीण योजना
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारची एक महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी मिळालेला पंधराशे रुपये प्रति महिना दिला जातो हा 1500 रुपयाची आर्थिक मदत ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पाठवली जाते.
आतापर्यंत लाडकी बहिण योजनांमध्ये 15 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आता या योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया पण सुरू केलेली आहे त्यामुळे अपात्र महिला लाभ घेऊ शकणार नाहीत. 18 नोव्हेंबर ही आखरी तारीख आहे.

पुढील तासांमध्ये 16 हप्ता वितरण
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही दिवसांमध्येच राज्य सरकारला सामाजिक व न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी सोळाव्या हफ्त्या वितरणासाठी प्राप्त झाला आहे.
महिला व बालविकास विभागाकडून आता 16 व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरु झाले आहे असे मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे आपल्या क्स पोस्टवर केली आहे. लाडकी बहिण योजनेतील सोळावा हप्ता पंधराशे रुपये ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा होतील आणि उर्वरित महिलांना पुढील दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील.

या महिलांना तीन हजार रुपये मिळतील
लाडकी बहिण योजनेमध्ये पंधरावा हप्त्याचे वितरण हे दिवाळी सणाच्या अगोदर म्हणजेच 9 ऑक्टोंबर पासून पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु काही महिलांचे अर्ज हे थकीत असल्यामुळे त्यांना 15 हप्त्याचे वितरण त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही.
ज्या महिलांना 15 व्या हप्त्याचे 1500 रुपये आले नाही त्या महिलांना आता सोळाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आणि 15 व्या हप्त्याचे 1500 रुपये असे मिळून एकत्रितपणे तीन हजार रुपये पुढील एक-दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

16 हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे.
त्यानंतर आपली कंट्रोलॉग इन या वर क्लिक करायचं आहे.
आता आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला तुमच्यासमोर इंस्टॉलमेंट स्टेटस असे दिसेल तिथे क्लिक करायचं आहे.
आता तुम्हाला आपलिकेशन नंबर आणि कॅपच्या कोड टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला तुमच्यासमोर सोळाव्या हाताचे पेमेंट स्टेटस दिसेल.
याव्यतिरिक्त जर आपल्याला 16 हप्त्याचे पेमेंट स्टेटस पाहायचे असेल तर आपल्या बँकेची संपर्क साधायचा किंवा मोबाईल बँकिंग इथून पण आपण आपले पेमेंट स्टेटस शेअर करू शकता.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.