Ladki Bahin Yojana काही काळासाठी स्थगिती
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ठरलेली आहे या योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण पूर्ण ताकतीने ही योजना महाराष्ट्रभर राबवली आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली.
1 जुलै 2024 पासून या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि पाहता पाहता ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ देणे महिलांना सुरू झाले. राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहे म्हणजे या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे पण आशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही आणि त्याच प्रमाणे त्यांना दिवाळी बोनस पण मिळाले नाही.
राज्य सरकारने राज्यांमधील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यानुसार राज्यांमधील दोन कोटीहून अधिक पात्र महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत या योजनेचे अर्ज करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोंबर च्या रात्री 12:00 वाजेपर्यंत मुदत वाढ करण्यात आली होती परंतु आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे अर्जाची पडताळणी करण्यासह सर्व प्रक्रिया बंद झाली आहे त्यामुळे नवीन अर्ज प्रक्रिया अर्जामधील सुधारणा या सर्व प्रक्रिया बंद झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आणि निवडणुकांच्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे या योजनेला काही का स्थगिती देण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana या योजनेच्या अर्जासाठी वेब पोर्टल आणि नारीशक्ती ऐप ची मदत घेतली जात होती परंतु या दोन्हीही सुविधा सध्या बंद आहेत ज्या महिलांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्ज केले आहेत ते अर्ज पडताळणीसाठी थांबवण्यात आले आहे तसेच नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे शिवाय काही अर्जामध्ये सुधारणा करून रिसबूड करावयाचे होते मात्रा ते देखील होत नसल्याचे सीएससी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे आणि पुढील टप्पा याशिवाय त्रुटी असलेल्या अर्जाचे पडताळणी प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 23 नोव्हेंबर नंतरच अनुदान जमा होणार आहे. यासोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे तसेच काही महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे त्यांचे अनुदान थांबवले आहे त्यामुळे त्यांचे सीडींग झाल्यानंतर बँक प्रक्रियेमधील अनुदान या लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala tar ek month che paise bhetle nahi seeding pan jhalay approved pan jhalay
Mala tr ek hi month che pyase nahi ale can you tell me something