Ladki Bahin Yojana : उर्वरित महिलांना जूनचा हप्ता 1500 रुपये कधी जमा होणार पहा अपडेट

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June Hapta 1500 Updates :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे मागील वर्षांमध्ये सुरू झालेल्या या योजनेला महिलांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना या योजनेमध्ये कोट्यावधी महिलांसाठी प्रत्येक महिन्याला 1500 रुपयेची आर्थिक मदत ही राज्य सरकारकडून दिलेली दिली जाते.लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे व वितरण पूर्णपणे झालेले आहे परंतु आता 12 वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु अनेक महिला अशा आहेत की त्यांना आता पण जूनचा हप्ता जमा झालेल्या नाही त्याबद्दल आपण पूर्ण अपडेट घेऊया.

hapta 12 aa

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,

जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरण

लाडकी बहिण योजनेमध्ये 12 वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरणास 5 जुलै पासून सुरुवात झाली होती यासाठी महिला व बालविकास विभागाकडे 2989 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता सुरुवातीला 5 जुलै रोजी लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले परंतु त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा बँकेचे डीबीटी सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालेला नाही.
प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 3-4 दिवसांमध्ये होत असते परंतु या वेळेस परिस्थिती वेगळी झाली आणि आज तब्बल बारा दिवस उलटून पण पात्र महिलांच्या पण बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांना आता अपेक्षा आहे ती जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये येण्याची याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.

yojana 4

लाडकी बहीण योजनेच्या अटी, निकष आणि तक्रार

लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र महिलांसाठी जे निकष लावले होते त्यामध्ये ज्या महिलांनी अचूकपणे पात्र झालेले आहेत अशा महिलांना सुद्धा जुनचा हप्ता आलेला नाही त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असल्याचे दिसून येत आहे सरकारकडून याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित आहे अटी आणि निकष पारदर्शक पद्धतीने सामोरे आणणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज केले होते त्यांना तक्रार करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे परंतु ज्या महिला नारिशक्ती ॲपद्वारे आपले अर्ज भरलेले आहेत त्यांना ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा नगरपंचायत किंवा विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार करावी लागत आहे. त्यामुळे बहुतेक पात्र महिलांना तक्रार पण करायलाही जावे लागते. महिन्याचा हप्ता जरी जमा होत नसेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकांसोबत पण भेटून आपले शंकेचे निराकरण करू शकतात. आणि ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे त्यांनी टोल फ्री नंबर वरती पण कॉल करू शकता.

Ladki Bahin Yojana June 12th Installment 20250710 221424 0000

महिलांना जूनचा हप्ता न येण्याचे कारण

लाडकी बहिण योजनेअंतर्गत फक्त पात्र लाभार्थींनाच आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्ज फेटाळण्यामागे काही ठळक कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे, त्या अपात्र
  • आयकर भरणाऱ्या महिला अर्जदार अपात्र
  • नमो शेतकरी सन्मान योजनेंचे लाभार्थी
  • संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनांमधून आधीच लाभ घेतलेले अर्जदार
  • एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास अर्ज बाद
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment