Ladki Bahin Yojana 8th Hapta : फेब्रुवारीचा 8वा हप्ता 1500 रुपये याच लाडक्या बहिणींना मिळाणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Feb 8th Installment 1500 rupeye Update

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 रोजी सुरू झाली महाराष्ट्र सरकारने ही योजना महिलांना सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्थिति मजबूत करण्यासाठी महिलांसाठी लाभदायक योजना राज्य सरकारने अमलात आणली. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहायता मिळाली त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी एक पर्यायी मार्ग मिळाला. लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 7 हप्त्याचे वाटपही झाले आहे. त्यामध्ये प्रत्येक महिना 1500 रुपये याप्रमाणे 10 हजार 500 रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता प्रतीक्षा लागली ती लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 8 व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येतील हे आपण सविस्तर यामध्ये पाहूया.

Ladki Bahin Yojana Last Date :

Ladki Bahin Yojana फेब्रुवारीचा 8 वा हप्ता कधी येइल

लाडक्या बहिणींना कालपासून फेब्रुवारीचा 8 वा हप्ता मिळयला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एका भाषणामध्ये सांगितले होते की फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा आठ दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल त्यांनी स्वतः म्हटले होते 3500 कोटी रुपयांच्या चेक वरती साइन केलेली आहे. ही 3500 रक्कम फेब्रुवारीच्या आठव्या हाताची पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कालपासून घेण्यास सुरुवात झालेली आहे. तरी उर्वरित लाडक्या बहिणींना एक-दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा करण्यात येतील. काही महिलांच्या बँक खात्यामध्ये सोमवारपासून पण जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana 8th Installment Status,
ladki bahin yojana 8th installment date

याच महिलांना फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळेल

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 41 लाख महिलांना 7 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे वितरित झाले आहे म्हणजे जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत. आता राज्य सरकार आता सर्व लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी करत आहे त्यामुळे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन ज्या महिलांनी सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये कोणी आयकर भरत असेल तर अशा महिलांना लाभ दिला जाणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचा खूप महिलांनी बनावट दस्तावेज जमा करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये फक्त ज्या महिलांच्या निकषांमध्ये म्हणजे नियमाने अटीमध्ये बसतील त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर निष्पन्न होईल की त्या लाडक्या बहिणी या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांनाच फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana अपात्र महिलांमुळे राज्य सरकारचे 450 कोटीचे नुकसान

महाराष्ट्र सरकार द्वारा चालवली जात असलेली लाडकी बहिण योजनेतील 5 लाख पेक्षा जास्त महिला ह्या अपात्र करण्यात आलेले आहेत. आणि राज्य सरकार आदेश दिलेले आहे सर्व अंगणवाडी सेविकांना व विशेष अधिकाऱ्यांना की ज्या महिला निकशात बसत नाहीत त्यांना वगळण्यात यावे. या 5 लाख महिलांनी जुलैपासून जानेवारीपर्यंतचा 7 हप्ताचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत या पैशाची मिळून रक्कम ही 450 कोटी रुपये होत आहे आणि लाडक्या बहिणीकडून ही रक्कम परत पण घेतली जाणार नाही असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यामुळे राज्य सरकारच्या आर्थिक बजेटवर ताण पडला आहे. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरूच राहणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 8th Hapta : फेब्रुवारीचा 8वा हप्ता 1500 रुपये याच लाडक्या बहिणींना मिळाणार”

Leave a Comment