Ladki Bahin Yojana e kyc Online Apply महाराष्ट्र link ekyc
Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc Update : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे, तसेच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत व्हावी या उद्देशाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. १,५००/- ची आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी, गैरप्रकार आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने आता सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (eKYC – Electronic Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.
ई-केवायसी (eKYC) का आहे महत्त्वाची | Majhi Ladki Bahin Yojana eKYC Online

- पारदर्शकता आणि पडताळणी: योजनेचा लाभ फक्त खऱ्या आणि गरजू महिलांनाच मिळावा, यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करताना फक्त ‘स्वयं-घोषणा’ (Self-Declaration) घेतली गेली होती, पण eKYC द्वारे आता आधार कार्ड आणि कुटुंबाच्या माहितीचे डिजिटल सत्यापन केले जात आहे.
- अपात्र लाभार्थ्यांना वगळणे: ई-केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक Aadhar Card वापरून कुटुंबातील वार्षिक उत्पन्न Income (₹२.५० लाखांपेक्षा कमी), आयकर भरणारे सदस्य आणि कुटुंबातील सदस्यांकडे असलेले चारचाकी वाहन यांसारख्या पात्रता अटींची कठोरपणे तपासणी केली जाईल. यामुळे अपात्र लोक योजनेतून आपोआप वगळले जातील.
- लाभ सुरू ठेवण्यासाठी अनिवार्य: ज्या महिलांना त्यांचे मासिक ₹१,५००/- चे हप्ते पुढेही नियमितपणे सुरू ठेवायचे आहेत, त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी Ekyc न केल्यास तुमचा हप्ता बंद होऊ शकतो.
- अंतिम मुदत: सर्व पात्र लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे.Ladki bahin yojana ekyc error problem
ई-केवायसी कुठे करावी? | Mukhyamantri Ladki Bahin Yojana eKYC

ई-केवायसी प्रक्रिया केवळ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवरच (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) करावी. बनावट वेबसाइट्सपासून सावध राहणे आवश्यक आहे.
थोडक्यात: ई-केवायसी म्हणजे तुमच्या लाभाची खात्री! योजनेचा तुमचा हक्क कायम राखण्यासाठी ही पडताळणी वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ladkibahin maharashtra gov in ekyc
लाडकी बहीण योजनेची” ई-केवायसी (eKYC) मोबाईल Mobile किंवा लॅपटॉपवरून Laptop कशी करायची, बघुया याबद्दल सविस्तर माहिती.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (eKYC) कशी करावी (मोबाईलवरून) Ladki Bahin Yojana ekyc Online Mobile
- ई-केवायसी सुरू करण्याची प्रक्रिया:
तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून ladkibahine.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर Website दिसणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार क्रमांक टाका:
नवीन पेजवर, ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक Aadhar Card Number टाका.
दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि “मी सहमत आहे” या पर्यायावर टिक करा.”ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.
- ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन:
लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक aadhar card link असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल .
तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक:

आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल, तर पतीचा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा Captcha भरा, “मी सहमत आहे” वर टिक करा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा..
पती किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी OTP Submit टाकून सबमिट करा.
(टीप: ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पर्याय आल्यास आपल्याला माहीत उपलब्ध करून देण्यात येणार)
- जातीचा प्रवर्ग निवडा:
आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (कॅटेगरी) निवडायचा आहे, जसे की SC, ST, OBC, VJ (A), NT (B), NT (C), NT (D), SBC किंवा Open/General.
- डिक्लेरेशन (घोषणा) आणि माहितीची पडताळणी:
पहिला प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत.” या प्रश्नासाठी तुम्हाला ‘होय’ YES निवडायचे आहे, कारण हे वाक्य बरोबर आहे.
दुसरा प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” हे एक डिक्लेरेशन Declaration आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा ‘होय’ YES निवडायचे आहे.
दोन्ही ठिकाण ‘होय’ YES निवडल्यानंतर, दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल, यावर टिक करून “सबमिट करा” Submit बटणावर क्लिक करा.
- ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण:
“तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल, याचा अर्थ तुमची केवायसी झाली आहे.

- केवायसी झाली आहे की नाही, हे कसे तपासावे?
त्याच वेबसाइटवर जाऊन लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाका .
“मी सहमत आहे” वर क्लिक करून “ओटीपी पाठवा” वर क्लिक केल्यास, “या आधार क्रमांकाची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल.
- सर्वर समस्या आणि वेळ:
वेबसाइटवर जास्त लोड असल्यामुळे ओटीपी येण्यास किंवा ई-केवायसी पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते. पहाटे केवायसी करताना सर्वर व्यवस्थित चालत होता, त्यामुळे रात्री किंवा पहाटे ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे का आवश्यक आहे?
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थींना त्यांचे हप्ते नियमित मिळावेत यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत काय आहे?
सरकारने सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेची जर ई-केवायसी केली नाही तर काय होईल?
जर तुम्ही विहित मुदतीत ई-केवायसी केली नाही, तर योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
ई-केवायसीसाठी मुख्यत्वे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) लागतात.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कुठे आणि कशी करायची?
तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करू शकता किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर मदत घेऊ शकता.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.