Ladki Bahin Yojana e KYC Update Last Date On 30 April 2026 :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना ठरली आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना 1500 रुपयाचा लाभ प्रति महिना मिळत असतो आणि त्यामध्ये पात्र महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे.
या योजनेमध्ये आतापर्यंत 20 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे परंतु अनेक महिलांना मागील काही महिन्याचे हप्ते प्राप्त झाले नाहीत त्याचे कारण केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे अनेक महिलांचे हफ्ते थांबले आहेत ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही अशाच महिलांना हफ्ते येत नाहीत त्यासाठी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी आता केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana e KYC Update Last Date On 30 April 2026

Ladki Bahin Yojana e KYC Update
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

केवायसी प्रक्रियेत मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 45 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्यामुळे केवायसी प्रक्रियेसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये लाडक्या बहिणींची केवायसी न केलेल्या महिलांची संख्या आणि केवायसी मध्ये दुरुस्ती असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. तसेच अनेक महिलांची केवायसी प्रक्रिया मधील प्रश्न चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया ही झाली नाही. त्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झालेली आहे परंतु त्या केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती आहे. त्यामुळे अनेक विभागातून अनेक जिल्ह्यातून महिला संस्थाकडून केवायसी प्रक्रियेमध्ये मुदतवाढ द्यावी असे काही प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आले होते त्यामुळे आता केवायसी प्रक्रियेसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

केवायसी प्रक्रिया कशी करायची
लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या सप्टेंबर 2025 मध्ये GR काढण्यात आला होता महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहिणी योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया पात्र महिलांसाठी बंधनकारक केली. त्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिना नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये केवायसी प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पाडण्यात आला होता परंतु त्यानंतरही लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी असल्यामुळे अजून मुदतवाढ देऊन 31 डिसेंबर शेवटची तारीख केली होती परंतु त्यामध्ये पण अजून मुदतवाढ देऊन 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख होती.
ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा महिलांना परत केवायसी प्रक्रिया करायची गरज नाही परंतु ज्या महिलांचे हप्ते थांबले आहेत त्या महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे काय म्हटल्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती !

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.