Ladki Bahin Yojana Complete Kyc in 2 Minute :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण करायचीच आहे त्या महिलांसाठी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये प्रक्रिया पूर्ण करू शकता.
मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत काही महिन्यापासून महिला व बाल विकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली आहे त्यामध्येच आता मागील काही महिन्यापासून फक्त 1 कोटी 75 लाख महिलांचीच केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे अजूनही लाखो महिलांचे केवायसी प्रक्रिया शिल्लक आहे त्यांच्यासाठी दोन मिनिटांमध्ये केवायसी प्रक्रिया कशी करायची याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Complete Kyc in 2 Minute

केवायसी प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेमध्ये नुकताच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देऊन परत एकदा केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची किंवा केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्यांच्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ करून दिली आहे. केवायसी प्रक्रियेची मुदत वाढ करण्याच्या मागचे कारण असे की काही तांत्रिक कारणामुळे किंवा ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि अनेक बँकांमध्ये खूप गर्दी असते त्यामुळे सुद्धा केवायसी प्रक्रिया अनेक अडथळे निर्माण झाले होते आणि लाखो महिलांनी विनंती अर्ज पण सादर केले होते त्यामुळे ही मुदतवाढ 30 एप्रिल पर्यंत करण्यात आलेली आहे.

राज्य सरकारचे लाडक्या बहिणींना आव्हान
महिला व बाल विकास मंत्री आजची तटकरे यांनी आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्टपणे माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेमधील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या 1500 रुपयांच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी आमचे प्रयत्न असतील त्यामुळेच केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ करून दिली आहे ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना पुढेही लाभ मिळत राहावा आणि या योजनेच्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले आहेत किंवा गैरफायदा घेऊन या योजनेचा लाभ घेतले असलेल्या महिलांसाठी ही केवायसी प्रक्रिया आहे जेणेकरून जी महिला पात्र आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा.

केवायसी करण्यासाठी सोपी पद्धत
1.सर्वप्रथम मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. म्हणजेच या वेबसाईटवर जा ladkibahin.maharastra.in.
2.आता तुम्हाला तुमच्या अर्ज क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा
3.त्यानंतर तुम्हाला ई केवायसी असे नाव दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
4.आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड तिथे टाकून ओटीपी बटनावरती क्लिक करा.
5.त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो तिथे दर्ज करा.
6.आता तुम्हाला सबमिट बटन वरची क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नवीन पेज दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ॲप द्वारे कशी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची
सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर वरती जाऊन नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड करून ओपन करा.
त्यानंतर तुम्हाला तिथे अर्जाची स्थिती असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
जर तुमची केवायसी प्रक्रिया झाली असेल तर त्या अर्जामध्ये दिसेल नाहीतर तुम्हाला ई केवायसी करा असं दिसेल त्यावरती क्लिक करा.
आता तुम्हाला आपला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी या बटणावर क्लिक करा.
आता तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला पूर्ण केवायसी प्रक्रियेच्या अर्ज दिसेल तो पूर्ण विचारलेली माहिती टाकून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सबमिट बटनाची क्लिक करा.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.