मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जुलै महिन्याचा 13वा हप्ता
Ladki Bahin Yojana 13th Installment Date Maharashtra
Ladki Bahin Yojana 13th Installment Release: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महायुती शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. मात्र, जुलै महिन्याचा १३वा हप्ता अद्याप जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या संदर्भात, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
कधी मिळणार जुलै महिन्याचा 13वा हप्ता? | Ladki Bahin Yojana August Installment Date

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
त्यांनी जाहीर केल्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपासून हा सन्मान निधी वितरित केला जाईल. हा निधी थेट आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.
26 लाख महिलांचे पैसे बंद होणार?
राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली असून, अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. मात्र, काही अनियमितता समोर आल्या आहेत.
- अपवाद: योजनेच्या निकषांचे उल्लंघन करून काही महिलांनी अर्ज केले आहेत. याव्यतिरिक्त, १४ हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
- सरकारची भूमिका: या अनियमिततेमुळे सरकारने सर्व विभागांकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. या तपासणीत सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, अशा अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थांबवले जाण्याची शक्यता आहे.
या योजनेची लोकप्रियता कायम ठेवून, ती योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दिसते. या संदर्भात आणखी काही नवीन माहिती आल्यास आम्ही तुम्हाला नक्की कळवू.
या महिलांना 3000 हप्ता मिळणार | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

लाडकी बहिण योजनेमध्ये राज्य सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्यात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे, कारण मागील वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्तानेच लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्यात आले होते याच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मागील वर्षी 3000 रुपये जमा करण्यात आले होते.
त्यामुळे यावर्षी पण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून एकत्रितपणे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
ज्या महिला जून महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहेत परंतु जून महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे 1500 रुपये प्रमाणे एकत्रितपणे 4500 रुपये पण येऊ शकतात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्या होणार होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीला आतापर्यंत किती रक्कम मिळाली | Ladki Bahin Yojana Latest News
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 महिन्यात या योजनेची सुरुवात केली असून तेव्हापासून आतापर्यंत लाडक्या बहिणीला 1500 रुपये दरमहा निधी दिला जात आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या लाभ घेतलेला आहे, दरम्यान लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये हप्ता वाढून 2100 रुपये देण्याची घोषणा पण केली होत. आतापर्यंत लाडक्या बहिणीला एकूण 12 हप्ते मिळून 18 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळालेले आहेत.
हे काम करां तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता | Ladaki Bahini Yojana today’s update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्यात देण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हप्ते लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खाते जमा करण्यात आलेले आहे, पण मागच्या मे महिन्यात 5 लाख महिलांनी केवायसी केलेले नसल्याचे समोर आलेल्या त्यामुळे त्यांना या योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता मिळाला नाही.
त्यामुळे त्या लाभार्थी महिलांनी बँक खात्यात आधार कार्ड लिंक करून घेणे व तिथे KYC करणे गरजेचे आहे तरच त्यांना पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळणार नाही तर त्यांना या योजनेच्या लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana जुलै पैसे कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता 9 ऑगस्ट पासून मिळण्यास सुरुवात होणार.
लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्यात किती रुपये हप्ता मिळणार?
लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्याच्या 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
July month has come to an end and it is now August month , when will we get our july installment