Ladki Bahin Yojana Rejected list Update
Ladki Bahin Yojana Apatra Mahila :‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आली. ही योजना राज्यभरात अत्यंत लोकप्रिय ठरली असून, निवडणुकीदरम्यान ती गेम चेंजर म्हणून सिद्ध झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 चा हप्ता जमा केला जातो.
मात्र, आता या योजनेतून राज्यातील सुमारे सव्वा लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारने एक प्रकारे लाखो ‘लाडक्या बहिणीं‘ना धक्का दिला आहे.
लाखो लाडक्या बहिणीला सरकारने एक प्रकारे झटका दिलेला आहे, तर बघूया याबद्दल सविस्तर बातमी कोणत्या महिलांना या योजनेत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
सरकारचा ‘लाडक्या बहिणीं’ना मोठा धक्का | Ladki Bahin Yojana Ineligible Mahila

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई: योजनेसंदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
अपात्रता: खोटी माहिती, बनावट कागदपत्रे आणि निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करून सरकारने एकाच वेळी लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढले आहे.
सर्वेक्षण: अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केले होते. यासाठी सुमारे सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आले होते. त्यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली आणि अपात्र महिलांना शोधून काढले.
या शहरातील महिला झाल्या अपात्र | Ladki Bahin Yojana Apatra Mahila

लाडक्या बहीण योजनेच्या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश होता.
वयोगटाची तपासणी: 65 वर्षांपेक्षा जास्त आणि 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या महिलांनी लाभ घेतला होता, त्यांच्या अर्जांची तपासणी करण्यात आली.
आकडेवारी: या तपासणीत एकूण 1,33,335 अर्जांची पडताळणी झाली. यापैकी 93,000 अर्ज पात्र ठरले, तर 40,000 अर्ज अपात्र ठरवण्यात आले.
या कारणांमुळे महिला ठरल्या अपात्र
महिला अपात्र ठरण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
वय मर्यादा: 21 वर्षांखालील किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असताना अर्ज करणे.
चुकीची माहिती: चुकीचे दस्तावेज किंवा खोटी माहिती देऊन लाभ घेणे.
एका घरात दोनपेक्षा जास्त महिला: एकाच घरातून दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्यास.
इतर योजनांचा लाभ: अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत असताना या योजनेसाठी अर्ज करणे.
तुमचे नाव अपात्र यादीत आहे का, असे तपासा | Ladki Bahin Yojana Apatra list Kashi Pahavi
जर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळाला नसेल आणि तुमचे नाव अपात्र यादीत असल्याचा तुम्हाला संशय असेल, तर तुम्ही खालील प्रकारे तपासणी करू शकता:
तालुका महिला विकास कार्यालय: तुमच्या तालुक्याच्या महिला विकास कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.
अधिकृत पोर्टल: सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.