Ladki Bahin Yojana New Update Today
Ladki Bahin Yojana 2100 Hafta Update: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बंपर बहुमत मिळाले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती ने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेच्या हप्ता 1500 रुपये वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे, आता याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
लाडकी बहीण योजनेत इतक्या महिलांना मिळणार हप्ता | Ladki Bahin Yojana 8th Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपये हप्ता प्रति महिना मिळत आहे, मागच्या महिन्यात राज्यातील 2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता मिळाला.
लाडकी बहीण योजनेच्या या महिन्याच्या हप्ता लवकराच सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तरीपण संबंधित विभागाने लाडकी बहीण योजनेत निकष च्या बाहेर जाऊन लाभ घेतल्या असलेल्या महिलांचे अर्जाची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे.(Ladki Bahin Yojana 2100 Hafta )
लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाचे हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana 2100 Hafta Update
![लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 'या' तारखेला २१०० रुपये मिळणार, तारीख जाहीर Ladki Bahin Yojana 2100 Hafta 2 Ladki Bahin Yojana 2100 Hafta New Update](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2025/02/image-7.webp)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महायुतीने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर पंधराशे रुपयांच्या हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे.
याबद्दल यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 हप्त्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे, राज्यात 1 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे.
या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहीण योजनेसाठी 2100 रुपये प्रतिमाह हप्ता ची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Ladki Bahin Yojana 2100 Hafta New Update)
त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष आता 1 मार्च रोजी सादर होणारे अर्थसंकल्पा कडे लागलेली आहे.
याबद्दल अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे, मात्र आतापर्यंत महिला व बाल विकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवलं नसल्यास सांगण्यात येत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 हप्ता मार्चमध्ये मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे.
इतक्या महिला आतापर्यंत झालेल्या योजनेत अपात्र | Ladki Bahin Yojana Scrutiny
![लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 'या' तारखेला २१०० रुपये मिळणार, तारीख जाहीर Ladki Bahin Yojana 2100 Hafta 3 Ladki Bahin Yojana 2100 Hafta New Update](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2025/02/a4c62fb0-86d3-461c-9bbf-975399f064cc-1-1524x857.webp)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही निकष निश्चित केले होते पण काही महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेच्या लाभ घेतलेला आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या एकूण 2 लाख 30 हजार महिला आहेत,तर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या 1 लाख 10 हजार आहे, तसेच ज्या महिलांच्या नावे कुटुंबात चार चाकी गाडी आहे किंवा नमो शक्ती योजना लाभार्थी असलेल्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आले असे एकूण 5 लाख महिलांना या योजनेत आतापर्यंत पात्र ठरवण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
![लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! 'या' तारखेला २१०० रुपये मिळणार, तारीख जाहीर Ladki Bahin Yojana 2100 Hafta 4 b25acb9725c3e49bf0f0190c5c0687a0](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/07/b25acb9725c3e49bf0f0190c5c0687a0.jpg)
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.