Ladki Bahin Yojana eKYC kashi karychi : महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांची ही वाटचाल मागील एक वर्षापासून सुरू आहे.
या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
लाडकी बहीण योजनेच्या हप्ता सुरळीत मिळावा व योग्य महिलांना लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि येत्या 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात ही मुभा दिलेली आहे.
खूप साऱ्या महिलांची ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झालेले नाही, त्यामुळे त्यांच्या हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.
अशा लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आहे तसेच महिलांचे पती किंवा वडील हयात नाही/घटस्फोटीत, एकल आहे अशा महिलांसाठी पण आनंदाची बातमी आहे तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
ई केवायसी ची शेवटची तारीख काय आहे | Ladki Bahin maharashtra gov in e-kyc Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थींना 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला दिला जातो.
योग्य महिलांना हफ्ता मिळावा, सुरळीत हप्ता मिळावा यासाठी महिला बालविकास विभागाने ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेले आहे.
या योजनेमध्ये काही महिलांनी बोगस कागदपत्रे व निकष च्या बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे, त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती मिळाली आहे.
ईकेवासी प्रक्रिया करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने अधिकृत पोर्टल तयार केले आहे, या पोर्टलच्या साह्याने सर्व लाभार्थी महिलांनाही केवायसी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
परंतु सर्वरची समस्या असल्यामुळे किंवा ओटीपी एरर येत असल्यामुळे खूप साऱ्या महिलांची केवायसी होत नाही आहे .
काही महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा घटस्फोटीत अशा महिलांना या केवासी प्रक्रियेमध्ये कोणताही पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे त्यांची पण ई केवायसी प्रक्रिया रखडलेली आहे अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे.
लाडकी बहीण eKYC: पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी वेबसाईटवर नवा पर्याय; अशी पूर्ण करा प्रक्रिया

नवीन पर्याय उपलब्ध होणार: ज्या महिलांना पती नाहीये किंवा ज्यांचे वडील नाहीत ladki bahin ekyc pati nasel tar kay karave (उदा. विधवा किंवा घटस्फोटीत महिला), त्यांच्या eKYC साठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच एक नवीन पर्याय (Option) जोडण्यात येणार आहे.ladki bahin yojana ekyc vadil nasel tar kay karave
अपलोड करावी लागणारी कागदपत्रे: या महिलांना eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये समावेश असेल:
- पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate).
- घटस्फोट झाला असल्यास, घटस्फोटाचे कागदपत्रे.
अधिकृत घोषणा: ही माहिती राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली असून, पात्र महिलांना लाभापासून वंचित राहू नये यासाठी हे बदल केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुदतवाढ: eKYC करण्याची अंतिम मुदत वाढण्याची शक्यता आहे, जेणेकरून सर्व पात्र महिलांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
सद्यस्थिती: दररोज साधारणपणे ४ ते ५ लाख महिलांची eKYC प्रक्रिया पूर्ण होत असून, आत्तापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त महिलांनी eKYC पूर्ण केले आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.