लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज असा करा rojgar mahaswayam gov in registration

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज | rojgar mahaswayam gov in Apply Online

Ladka Bhau Yojana 2024 Online Apply: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाची राज्यातील तरुण-तरुणीसाठी एक महत्त्वकांक्षी अशी स्वयंरोजगार व कौशल्य विकास करण्याची योजना शासनाने लागू केली आहे. राज्यातील महिला व तरुणीसाठी लागू केलेल्या लाडकी बहिण योजने पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना कौशल्य विकास व कार्य प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा हेतू आहे, तर या पोस्टमध्ये आपण जाणून घ्या की आपल्याला या लाडका भाऊ योजनेच्या लाभ कसे मिळेल व कुठे अर्ज करायचा, Ladka Bhau Yojana website? तर ही पोस्ट अखेरपर्यंत वाचण्याची कृपा करावी.

घटकतपशील
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीसुशिक्षित बेरोजगार युवा
वर्ष २०२४
उद्दिष्टउमेदवारांना उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रदान करून रोजगारक्षम बनवणे.
आर्थिक तरतूद₹5,500 कोटी
इंटर्नशिप कालावधी6 महिने
विद्यावेतनशासनाकडून देण्यात येणार, थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल
इंटर्नशिप संधींची संख्यादरवर्षी सुमारे 10 लाख
उमेदवार पात्रता1. वय: 18 ते 35 वर्षे 2. किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर 3. महाराष्ट्राचा रहिवासी 4. आधार नोंदणी 5. आधार संलग्न बँक खाते 6. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी
आस्थापना/उद्योजक पात्रता1. महाराष्ट्रात कार्यरत असावे 2. कमीत कमी 3 वर्षे स्थापन झालेले असावे 3. आवश्यक नोंदण्या: EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT, उद्योग आधार4. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी
ऑनलाइन नोंदणीउमेदवार आणि आस्थापना दोघांसाठी निर्दिष्ट महास्वयम पोर्टलवर उपलब्ध
फायदे1. उमेदवारांसाठी प्रत्यक्ष कार्यानुभव 2. रोजगार क्षमता वाढते 3. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते
अधिक माहितीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध

मुख्यमंत्री माझ्या लाडका भाऊ योजना काय आहे

2024 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण, आयटीआय पदविका उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण तरुणांना व तरुणींना स्टायपपेंड म्हणून आठ ते दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री कौशल्य विकास विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने करिता शासनाने 5500 कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ,उद्योजकांना त्याच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

www.rojgar.mahaswayam.gov.in Online Registration | Ladka Bhau Yojana Website

  • बारावी, आयटीआय, पदविका पदवी व पदव्युत्तर पास झालेले योग्य उमेदवार व रोजगार इच्छुक तरुण-तरुणी या https://rojgar.mahaswayam.gov.in  वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
  • विविध औद्योगिक क्षेत्रातील मोठे प्रकल्प, स्टार्टअप, विविध आस्थापने इत्यादी यांना आवश्यक असलेले कौशल्य मनुष्यबळाची मागणी या https://rojgar.mahaswayam.gov.in/ वेबसाईटवर ऑनलाईन नोंदवण्यात येईल.
  • लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेमार्फत उपलब्ध होतील.
  • खडका भाऊ यांना योजनेच्या कार्यप्रशिक्षणच्या कालावधी सहा महिने असेल या कालावधीमध्ये उमेदवारांना शासनामार्फत अधिकृत विद्या वेतन देण्यात येईल
  • विद्यावेतन लाभार्थी उमेदवाराच्या थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल
Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online
  1. महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम या रोजगार व उद्योग विभागाच्या वेबसाईटवर आधार कार्ड ने  नोंदणी केल्यावर आपण या वेबसाईटमधील लॉगिन करू शकता.
  2.  आधार कार्ड ने लॉगिन केल्यावर आपल्याला इथे आधार कार्ड प्रमाणे आपल्या संपूर्ण नाव, जन्म तारीख,संपूर्ण पत्ता लिहायचा आहे.
  3. तसेच आपल्याला आपला  या वेबसाईटवर नागरिकत्व, धर्म, जात, पोट जात हे पण नमूद करायचे आहे.
  4. त्यानंतर विचारलं जाईल आपण रोजगार करण्यासाठी उत्सुक आहात का स्वयंरोजगार करण्यासाठी  होय सेलेक्ट करा.
  5. नंतर आपल्याला आपला कॉलिफिकेशन विचारला जाईल  दहावी, बारावी ,डिप्लोमा, डिग्री जे काही आपल्या कॉलिफिकेशन असेल ते आपण तिथे  निवडायचे आहे.
  6. त्यानंतर तुम्ही आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देऊ आपले सर्व माहिती सेव करू शकता.
  7. पूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यावर आपण आधार कार्ड, पासवर्ड ने आपल्या महास्वयमला रोजगार पोर्टल मध्ये लॉगिन करून आपण दिलेल्या सर्व क्वालिफिकेशन डिटेलची सर्व माहिती विषय, स्ट्रीम, परसेंटेज ही माहिती भरून सेव करायचा आहे.
  8.  तसेच आपण कोणत्या प्रकारात मोडतात ते पण माहिती टाकायची आहे.
  9.  आपल्याला तिथे एक पासपोर्ट साईट फोटो प्रोफाइल मध्ये अपलोड करायची आहे.
  10.  तसेच आपल्याला एक रिज्यूम बनवून तिथे अपलोड करायचा.
  11. सर्व माहिती अचूकपणे भरल्यावर आपल्याला एम्प्लॉयमेंट कार्ड जनरेट होईल तो डाउनलोड करून आपल्याकडे ठेवायचा आहे तो एम्प्लॉयमेंट कार्ड नंतर आपल्याला रोजगार मेळावा किंवा नोकरी संदर्भात कामात येणार आहे. 

 Maza Ladka Bhau Yojana Online Form kaise bhare

लाडका भाऊ योजना उमेदवाराचे पात्रता

  1. लाडका भाऊ योजने चे दिलेले लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.
  3. लाडका भाऊ योजने मधे बारावी पास उमेदवारा ला 6 हजार रुपये आयटीआय पास डिप्लोमा पास उमेदवारा ला 8 हजार रुपये व ग्रॅज्युएट पदवीधर युवक/ युवतीना 10 हजार रुपये महिना आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळेल.
  4. या लाडका भाऊ योजनेच्या लाभ फक्त बेरोजगार उमेदवार पात्र आहे.
  5. योजनेमध्ये आपला बँक खाता आधार कार्ड DBT Link असने अवश्यक आहे .
  6. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागाच्या या ( महास्वयम ) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजना कागदपत्रे | Ladka Bhau Yojana Document

  • मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या आधार कार्डची गरज आहे 
  • आपण शिक्षण घेतलेला सर्व क्वालिफिकेशन असलेल्या डिप्लोमा, सर्टिफिकेट, डिग्री याची गरज आहे
  •  पासपोर्ट साईट फोटो
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज असा करा rojgar mahaswayam gov in registration”

  1. लड़कों और पुरुषों के लिए कोई योजना नहीं है

    Reply

Leave a Comment