लाडका भाऊ योजना फॉर्म | rojgar.mahaswayam.gov.in registration
ladka bhau yojana maharashtra in marathi: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांशी असल्या लाडकी बहीण योजना नंतर महाराष्ट्रातील तरुण आणि युवा पिढी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले की आमच्यासाठी काही योजना आणा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना नावाची नवीन योजना सुरू करण्याच्या घोषणा केली.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला माझ्या लाडका भाऊ योजना याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या योजनेद्वारे महाराष्ट्रातील बेरोजगार शिकलेला तरुणासाठी योग्य व्यावसायिक प्रशिक्षणाने कौशल्य प्रदान करून त्यांना मुख्य धारेत सामावून घेणे आहे.
या योजनेमुळे महाराष्ट्रातील शिकाऊ तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना योग्य कौशल्य देऊन त्यांच्या शिक्षणाानुसार योग्य मोबदला ला पण सरकारद्वारे दिला जाईल.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना काय आहे? | Ladka Bhau Yojana Details
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना दरमहा अनुदान दिले जाणार आहे, या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण आणि तरुणी पण सहभाग घेऊ शकतात.
या योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र असे असल्याने त्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या उपक्रमाच्या उद्देश प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी पुरवल्या आहेत, यासाठी महाराष्ट्रातील 5,500 हजार करोड रुपयांच्या निधी अर्थसंकल्पात मांडला आहे योजनेच्या उद्देश लोकांना युवकांना विविध उद्योग प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देणे आहे.
महाराष्ट्र सरकार लाडका भाऊ योजना मध्ये सुमारे १० लाख तरुण तरुणींना मोफत व्यावसायिक, उद्योगीक प्रशिक्षण संधी उपलब्ध ऊदेणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील तरुणांना त्याच्या कुटुंबांना व स्वतःला आधार देण्यात येईल क्षमता तसेच स्वावलंबी बनवण्याची ध्यास सरकारने घेतलेला आहे.
घटक | तपशील |
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | सुशिक्षित बेरोजगार युवा |
वर्ष | २०२४ |
उद्दिष्ट | उमेदवारांना उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रदान करून रोजगारक्षम बनवणे. |
आर्थिक तरतूद | ₹5,500 कोटी |
इंटर्नशिप कालावधी | 6 महिने |
विद्यावेतन | शासनाकडून देण्यात येणार, थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल |
इंटर्नशिप संधींची संख्या | दरवर्षी सुमारे 10 लाख |
उमेदवार पात्रता | 1. वय: 18 ते 35 वर्षे 2. किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर 3. महाराष्ट्राचा रहिवासी 4. आधार नोंदणी 5. आधार संलग्न बँक खाते 6. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी |
आस्थापना/उद्योजक पात्रता | 1. महाराष्ट्रात कार्यरत असावे 2. कमीत कमी 3 वर्षे स्थापन झालेले असावे 3. आवश्यक नोंदण्या: EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT, उद्योग आधार4. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी |
ऑनलाइन नोंदणी | उमेदवार आणि आस्थापना दोघांसाठी निर्दिष्ट महास्वयम पोर्टलवर उपलब्ध |
फायदे | 1. उमेदवारांसाठी प्रत्यक्ष कार्यानुभव 2. रोजगार क्षमता वाढते 3. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते |
अधिक माहिती | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध |
महाराष्ट्र लाडका भाऊ योजना 2024 याचे खालील प्रमुख उद्दिष्ट साध्य करणे केले आहे.
- कौशल्य विकास: राज्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणांसाठी उद्योगासंबंधी कौशल्य व व्यावहारिक प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य विकास करून नोकरीच्या स्पर्धेमध्ये सक्षम बनवणे.
- रोजगार क्षमता: औद्योगिक क्षेत्रात कुशल आणि कौशल्य असलेले तरुणाची मागणी बघता त्याची तफावत कमी करणे त्यामुळे रोजगार मिळणे शक्यता वाढते.
- आर्थिक साहाय्य: कौशल्या प्रशिक्षण घेत असलेल्या बेरोजगार तरुण तरुणांना आर्थिक सहाय्यता प्रदान करून त्याचे आर्थिक स्थिती वाढवणे.
- स्वयंरोजगार प्रोत्साहन: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कौशल्य देऊन त्याच्या आत्मविश्वास वाढवणे आणि स्वयंरोजगारांसाठी सक्षम करणे.
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता निकष | Ladka Bhau Yojana Eligibility
लाडका भाऊ योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला खालील अटी आहोत.
- लाडका भाऊ दिलेले लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या तुम्हाला रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.
- योजने मधे बारावी पास उमेदवारा ला 6 हजार रुपये आयटीआय पास डिप्लोमा पास उमेदवारा ला 8 हजार रुपये व ग्रॅज्युएट पदवीधर युवक/ युवतीना 10 हजार रुपये महिना आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळेल.
- या योजनेच्या लाभ फक्त बेरोजगार उमेदवार पात्र आहे.
- योजनेमध्ये आपला बँक खाता आधार कार्ड DBT link असने अवश्यक आहे .
- इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागाच्या या ( महास्वयम ) संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे
- कार्या प्रशिक्षण (इंटरशिप) कालावधी सहा महिन्याच्या राहील
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया | Ladka Bhau Yojana Online Form
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमध्ये अर्ज कसा करावा
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत रोजगार पोर्टलवर अकाउंट तैयार करून लॉगिन करायच्या आहेत, त्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्ड टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल
- महास्वयम या रोजगार पोर्टलवर आपण आपल्या लॉगिन केल्यावर त्यामध्ये आपल्याला आपले सर्व माहिती टाकायची आहे त्यामध्ये आपले संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक अहर्ता, बँक डिटेल्स ही सर्व माहिती अचूक भरायची आहे
- माझ्या लाडका भाऊ योजना साठी ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व माहिती बरोबर भरल्यावर आपल्याला त्यामध्ये आपली प्रिंट आउट काढून आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
- तसेच तुम्हाला विविध महाराष्ट्राच्या नोकरीच्या संधी व कौशल्या विकासचा संधीची माहिती या पोर्टलवर अधिकृतपणे मिळेल त्यामध्ये आपण ऑनलाइन अप्लाय करून या योजनेच्या लाभ घ्यावा.
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे |Ladka Bhau Yojana Benifits
लाडका भाऊ योजनेचे फायदे काय आहे
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारणे.
- उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे इंटरशिप द्वारे उमेदवारांना रोजगार सक्षम करून उद्योगाकरता कुशल मनुष्यबळ तयार करणे.
- मोफत औद्योगिक व कार्य प्रशिक्षण देऊन विविध उद्योगाच्या गरजा पूर्ण करणे विनामूल्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करणे.
- सुशिक्षित व्यक्तींना आवश्यक असलेल्या कौशल्य व आत्म निर्भर सुसज्ज करून स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करून देण्यात सक्षम करणे.
- प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्या प्रशिक्षण (इंटरशिप) संधी बेरोजगार युवक युतींना निर्माण करून देणे.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत किती पैसे ( स्टायफंड ) मिळणार
शैक्षणिक अहर्ता | स्टायफंड |
१२ वी पास | रु. 6,०००/- |
ITI / Diploma पास | रु. 8,०००/- |
पदवीधर /पदव्युत्तर | रु. 10,०००/- |
Ladka Bhau Yojana GR Download
लाडका भाऊ योजने अंतर्गत कोण पात्र आहे?
18 ते 35 वयोगटातील महाराष्ट्राचे रहिवासी ज्यांनी किमान 12वी उत्तीर्ण केले आहे, ते पात्र आहेत.
लाडका भाऊ योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) देऊन रोजगारक्षम बनवणे.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना इंटर्नशिपची कालावधी किती आहे?
सहा महिने.
माझा लाडका भाऊ योजना विद्यावेतन कसे दिले जाईल?
विद्यावेतन थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
लाडका भाऊ योजना उमेदवारांनी नोंदणी कुठे करायची आहे ?
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महास्वयम या रोजगार पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करायची आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.