Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत E-KYC प्रक्रियेमध्ये या महिलांसाठी नियमात बदल, केवायसी प्रक्रिया पूर्ण करा नाहीतर1500 मिळणार नाहीत

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana E-KYC Niyam Badal Process Update :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये जर तुम्हाला पुढील लाभ पाहिजे असेल तर KYC प्रक्रिया करणे गरजेचे आहे. लडकी बहीण योजनेमध्ये KYC प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या महिला विधवा आहेत घटस्फोटीत आहेत किंवा त्यांचे वडील किंवा त्यांचे पती यांचे निधन झालेले आहे अशा महिलांसाठी नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय बदल झालेले आहेत हे आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे पाहूया ज्या महिलांची E -KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख घेण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana E-KYC Niyam Badal Process Update

mudat

Ladki Bahin Yojana eKYC महाराष्ट्र gov in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
WhatsApp Image 2025 11 04 at 12.09.01 AM 1

E-KYC प्रक्रियेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहे

1.राज्यातील लाडकी बहीण योजनेतील जवळपास 70 टक्के महिलांनी E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अजूनही पात्र महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याच्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
2.अगोदर 18 नोव्हेंबर शेवटची तारीख होती परंतु ती वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत केलेली आहे.
3.ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना मंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे की लवकरात लवकर E-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
4.ज्या महिला घटस्फोटीत आहेत किंवा सिंगल आहेत आणि ज्या महिलांचे वडील किंवा त्यांचे पती यात नाहीत अशा महिलांना E-KYC प्रक्रियेमध्ये बदल करून देण्यात आलेले आहेत.

niyam badal

कोणत्या लाडक्या बहिणींच्या नियमात बदल

लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे वडील किंवा पती यांचे निधन झालेले आहे किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिलाना केवायसी करण्यासाठी अगोदर त्यांचे वडील किंवा पतीचे आधार नंबर लागत होता परंतु आता त्यामध्ये बदल करून वडील किंवा पती त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्या महिलांना कोर्टाचे सत्यप्रत घटस्फोटीत प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडायची आहे ही सत्यप्रत महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पण जमा करू शकता. या बदलामुळे महिलांना सुरळीतपणे लाडकी बहीण योजनेच्या लाभ पंधराशे रुपये मिळत राहील.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC,

केवायसी प्रक्रिया अशी करा

1.सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचे आहे
2.आता तुम्हाला केवायसी बॅनर दिसेल त्याला क्लिक करून घ्या.
3.आता तुम्हाला आधार नंबर आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी या बटन वर क्लिक करायचे आहे.
4.आता तुम्हाला आधार लिंक मोबाइल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
आता तुमची KYC प्रक्रिया झाली का नाही हे दिसेल.
5.जर केवायसी प्रक्रिया झाली असेल तर सक्सेसफुल असं मेसेज येईल जर केस प्रक्रिया झाली नसेल तर पुढील पेज खुलेल.
6.त्यामध्ये तुम्हाला पती किंवा तुमच्या वडिलांचा आधार नंबर कोड टाकायचा आहे आणि ओटीपी बटन वर सेंड करायचा आहे.
7.त्यामध्ये आता जर तुमचे पती किंवा वडील नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र लावायचे आहे आणि घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र तिथे दर्ज करायचे आहे.
8.आता सबमिट बटन वरती क्लिक करून झाल्यावर तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असं मेसेज येईल.

aditi tataaa

अंगणवाडी सेविकाकडे पण केवायसी प्रक्रिया करू शकता

लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना केवायसी प्रक्रियेमध्ये जर ऑनलाईन करता येत नसेल किंवा त्यांना शक्य नसेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे पण कागदपत्रे देऊन आपली KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
लाडकी बहीण योजनेमध्ये KYC प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये ज्या महिलांचे वडील किंवा पती यात नाहीत किंवा घटस्फोटीत महिलांसाठी नियमात बदल करण्यात आला आहे, अशा महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की तुम्ही तुमच्या वडील किंवा पती यांचे मृत्यू प्रमाणपत्र ज्या महिला घटस्फोटीत आहेत त्यांना घटस्फोटाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जमा करू शकता त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment