Ladki Bahin Yojana ekyc Check Status Online
Ladki Bahin Yojana ekyc Status – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला हप्ता सुरळीत मिळावा व योग्य महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी शासनाने लाभार्थी महिलांनाही ई केवायसी बंधनकारक केलेली आहे.
येत्या दोन महिन्यात सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी ekyc Update करणे अनिवार्य आहे, त्यामुळे या योजनेमध्ये गैरफायदा घेतलेला महिलांना शोधून त्यांना या योजने मध्ये बाहेर करायला शासनाला योग्य राहील.
Ladki Bahin Yojana KYC Process
तसेच ज्या महिलांना वेळेस हप्ते मिळत नाही अशा महिलांनाही ई केवायसी केल्यानंतर सर्व हप्ते सुरळीत मिळणार आहे.
त्यामुळे ई केवायसी करणे सर्वांना बंधनकारक आहे, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी केली असेल तर. त्याच्या स्टेटस चेक कसं करायचं याबद्दल जाणून घेऊया सर्व माहिती सविस्तरपणे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण ई केवायसी कसे करायचे | Ladki Bahin Yojana Ekyc
लाडकी बहीण योजना eKYC: मोबाईल/लॅपटॉपवरून फक्त ७ सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण करा!
लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम सुरू u- ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे.
eKYC प्रक्रिया (स्टेप-बाय-स्टेप) Step by Step Process

- वेबसाईट उघडा: तुमच्या मोबाईल/कम्प्युटरवरून ladkibahine.maharashtra.gov.in या अधिकृत Website वर जा आणि eKYC बॉक्सवर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार: तुमचा आधार क्रमांक (Aadhar Card Number) टाका, कॅप्चा (Captcha) भरा, ‘मी सहमत आहे’ वर टिक करून “ओटीपी पाठवा” बटण दाबा.
- पहिला OTP सबमिट: तुमच्या आधार card link असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा.
- पती/वडिलांचा आधार: आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका. (आधार कार्डवर ज्यांचे नाव आहे, त्यांचा क्रमांक वापरा.) कॅप्चा भरा आणि दुसरा OTP Submit करा.
- (टीप: ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्यावर माहिती दिली जाईल.)
- जात प्रवर्ग निवडा: तुमचा योग्य जात प्रवर्ग (कॅटेगरी) (उदा. SC, ST, OBC, Open/General) निवडा.
- घोषणा (Declaration): दोन्ही डिक्लेरेशन प्रश्नांसाठी (सरकारी कर्मचारी नसणे आणि कुटुंबात एक विवाहित व एक अविवाहित महिला असणे) ‘होय’ (YES) निवडा, कारण ही माहिती नियमांनुसार बरोबर आहे.
- अंतिम सबमिट: माहिती खरी असल्याची खात्री करून “सबमिट करा” (Submit) बटणावर क्लिक करा.
यशस्वीरित्या पूर्ण!
“तुमची इ केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” हा मेसेज दिसल्यास तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली.
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (eKYC) झाली आहे की नाही, ‘असे’ तपासा | Ladki Bahin ekyc Online Status

तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून खालील सोप्या पद्धतीने तुमची केवायसी झाली आहे की नाही, हे त्वरित तपासू शकता:
- वेबसाइटवर जा: तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून ladkibahine.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- eKYC लिंकवर क्लिक करा: वेबसाइटवर दिसणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई केवायसी पूर्ण करण्यासाठी” दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा.Ladki Bahin Yojana Ekyc Details
- आधार क्रमांक टाका: नवीन पेजवर, लाडक्या बहिणीचा (लाभार्थीचा) आधार क्रमांक टाका.
- कॅप्चा भरा: स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड Captcha Code (अक्षर आणि अंक) आहे तसा भरा.
- संमती द्या: “मी सहमत आहे” या पर्यायावर टिक करा.
- तपासा: “ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा
ई केवायसी पूर्ण झाली असे माहित पडेल | Ladki Bahin Yojana ekyc Update
जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर तुम्हाला त्वरित एक वॉर्निंग (Warning) मेसेज दिसेल की: “या आधार क्रमांकाची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” .
हा मेसेज दिसला, तर याचा अर्थ तुमची केवायसी झालेली आहे आणि तुम्हाला आता काही करण्याची गरज नाही.
जर तुम्हाला ओटीपी आला आणि पुढे प्रक्रिया सुरू झाली, तर याचा अर्थ तुमची केवायसी होणे बाकी आहे आणि तुम्ही ती पुढे पूर्ण करू शकता.
ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ | Ladki Bahin Yojana eKYC Last Date
eKYC बंधनकारक: या योजनेत लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे.
eKYC मुदत: राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासाठी सर्व 21 ते 65 वयातील पात्र लाभार्थी महिलांना दोन महिन्याच्या कालावधीत ई केवायसी साठी दिला आहे.
ज्यामध्ये इ केवायसी पूर्ण न केल्यास तुमच्या पुढील मासिक हप्ता बंद केला जाऊ शकतो.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.