Ladki Bahin Yojana e KYC Problem
Ladki Bahin Yojana e KYC Problem: लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना त्यांचे हफ्ते सुरळीत मिळावे याकरिता ई केवायसी करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे शासनाने सर्व लाडक्या बहिणीला येत्या दोन महिन्यात सर्वांना ई केवायसी EKYC करणे बंधनकारक केलेले आहेत..
परंतु लाडकी बहीण योजनेची Website ई केवायसी करताना अधिकृत पोर्टलवर लाभार्थी महिलांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे महिलांना मनस्ताप होत आहे.
काही महिलांना ओटीपी OTP येत नाही, तर काहींना ओटीपी टाकल्यानंतर एररच्या ERROR ऑप्शन येत आहे, Ladki Bahin Yojana e KYC Problem काहींना वेबसाईट ओपन WEBSITE होत नाही.
तर जाणून घेऊया याबद्दल सर्व समस्यांचे निराकरण व लाडकी बहीण योजनेत यशस्वीरित्या ई केवायसी KYC कशी करायची याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (eKYC) मधील प्रमुख अडचणी आणि उपाय

या पोस्ट मध्ये”लाडकी बहीण योजना” ई-केवायसी (eKYC) शी संबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (eKYC) मधील येणाऱ्या अडचणींची प्रश्नांची उत्तरे…
लाडकी बहीण योजनेची वेबसाइट चालत नाहीये, काय करू?

अडचण: वेबसाइटवर Ladki Bahin Yojana Website खूप लोड आहे, त्यामुळे ती व्यवस्थित काम करत नाही किंवा कधीकधी बंद असते .
उपाय: तुम्हाला खूप घाई असेल, तर रात्री १२-१ नंतर किंवा पहाटे ई-केवायसी EKyc करण्याचा प्रयत्न करा. योजनेसाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे तुम्ही या दोन महिन्यांत कधीही ई-केवायसी EKYC करू शकता.
Ekyc ई-केवायसी नक्की कोणी करायची?

ज्यांना योजनेचे पैसे नियमित मिळत आहेत, त्यांनी सुद्धा ई-केवायसी EKYC करणे आवश्यक आहे.
ज्यांचे हप्ते जून किंवा जुलैपासून बंद झाले आहेत, त्यांनी सुद्धा ई-केवायसी KYC करणे आवश्यक आहेत.
थोडक्यात, ज्यांनी फॉर्म Online Form भरले होते आणि ज्यांना योजनेचा लाभ चालू ठेवायचा आहे, त्या सर्व महिलांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी Ekyc करताना ‘सरकारी कर्मचारी’ आणि ‘विवाहित/अविवाहित’ या पर्यायांमध्ये काय निवडू?
ई-केवायसी EKYC करताना तुम्हाला दोन्ही ठिकाणी ‘होय’ Yes निवडायचे आहे .
पहिला प्रश्न (सरकारी कर्मचारी) व्यवस्थित दिलेला नाही, पण तरीही दोन्ही प्रश्नांसाठी ‘होय’ YES निवडा आणि तुमची केवायसी पूर्ण करा .
‘होय’ च्या जागी ‘नाही’ NO झाले, आता काय?
जर चुकून ‘होय‘ च्या जागी ‘नाही‘ झाले असेल, तर काळजी करू नका .
तुमच्या आधार कार्ड नंबरवरून कुटुंबाची माहिती आणि तुम्ही शासकीय कर्मचारी आहात का, याची माहिती मिळते. त्यामुळे याची चिंता करू नका.
यामध्ये दुरुस्तीचा काही पर्याय उपलब्ध झाल्यास, सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती दिली जाईल.
केवायसी एडिट Edit (दुरुस्ती) होते का?

सध्या ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करता येत नाही,
जर दुरुस्तीसाठी काही पर्याय उपलब्ध झाला, तर माहिती सविस्तरपणे दिली जाईल.
पती किंवा वडिलांचा आधार नंबर Aadhar Card Number कशासाठी घेतला आहे?
पती किंवा वडिलांचा आधार नंबर यासाठी घेतला जात आहे, जेणेकरून तो ट्रॅक करून त्यांच्या नावावर काय काय गोष्टी आहेत, याची माहिती मिळेल (उदा. गाडी आहे का, आयकर Income Tax भरतात का, शासकीय कर्मचारी आहेत का.
या माहितीवरून तुमच्या कुटुंबात नक्की काय आहे हे समजेल आणि त्यातून काही महिला अपात्र ठरवल्या जाऊ शकतात.
एका घरात तीन महिला असतील तर केवायसी कशी करायची?
नियमांनुसार, एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला पात्र आहे.
तुमच्या घरात दोनपेक्षा जास्त महिला असतील, तर फक्त एका विवाहित महिलेची आणि एका अविवाहित महिलेची केवायसी KYC करा.
बाकीच्या महिलांची केवायसी करू नका, अन्यथा तुमच्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र Ineligible ठरवल्या जाऊ शकतात.
माझी केवायसी KYC झाली आहे की नाही, हे कसे पाहायचे?
तुम्ही ज्या वेबसाइटवर Ladki Bahin Yojana Website EKYC केवायसी केली आहे, त्याच वेबसाइटवर जा .
तुमचा आधार नंबर टाका, संमती (consent) स्वीकारा आणि ‘ओटीपी पाठवा’ (send OTP) वर क्लिक करा (व्हिडिओ).
त्यानंतर तुम्हाला दाखवले जाईल की तुमची केवायसी आधीच केलेली आहे (“तुमची केवायसी ही ऑलरेडी केलेली आहे”) किंवा नाही .

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
E- kyc प्रोसेस करताना otp टाकून व्हेरिफाय केला व नंतर वडील किंवा पतीची माहिती भरताना error आला आणि site पूर्ण back गेली आता पुन्हा प्रोसेस करताना otp पाठवला जात नाही आहे व तिथे error दाखवतोय वडील किंवा पती यांचा आधार नंबर टाका पण पुढची प्रोसेस होत नाही आहे तर काय करावे याची माहिती द्यावी.
Try sometimes