Ladki Bahin Yojana eKYC Process
Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना त्यांचे हत्या सुरळीत मिळावे याकरिता ई केवायसी करण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे शासनाने सर्व लाडक्या बहिणीला येत्या दोन महिन्यात सर्वांना ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहेत.
परंतु लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना अधिकृत पोर्टलवर लाभार्थी महिलांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे महिलांना मनस्ताप होत आहे.
काही महिलांना ओटीपी येत नाही, तर काहींना ओटीपी टाकल्यानंतर एररच्या ऑप्शन (Ladki bahin yojana ekyc OTP error problem) येत आहे, तर काहींना वेबसाईट ओपन होत नाही, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व समस्यांचे निराकरण व लाडकी बहीण योजनेत यशस्वीरित्या ई केवायसी कशी करायची याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
लाडकी बहीण योजनेत यशस्वीरित्या ई केवायसी कशी करायची | ladki bahin maharashtra gov in ekyc

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व महिलांना सुरळीत हप्ते मिळावे व योजनेत पारदर्शकता यावी यासाठी शासनाने सर्व पात्र लाभार्थींना ई केवायसी करण्यासाठी बंधनकारक गेले आहे.
तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेत अशा प्रकारे केवायसी केल्याने तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होणार व तुम्हाला येणारे सर्व हप्ते योग्य वेळेत मिळणार.ladki bahin maharashtra gov in ekyc
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – e-KYC प्रक्रिया ladkibahin maharashtra gov in Ekyc

- संकेतस्थळावर भेट द्या
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा. - e-KYC फॉर्म उघडा
👉 मुखपृष्ठावरील e-KYC बॅनर वर क्लिक करा. - लाभार्थीची आधार पडताळणी
- आधार क्रमांक व कॅप्चा टाका.
- संमती देऊन Send OTP वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
- प्रणाली तपासणी
- जर e-KYC आधीच पूर्ण असेल → “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश येईल.
- जर पूर्ण नसेल → आधार क्रमांक पात्र यादीत आहे का ते तपासले जाईल.
- पुढील टप्पा (पात्र असल्यास)
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका.
- कॅप्चा भरून Send OTP करा.
- OTP मोबाईलवर आल्यावर टाकून Submit करा.
- जात व घोषणा (Declaration)
- आपला जात प्रवर्ग निवडा.
- खालील बाबी प्रमाणित करा (चेक बॉक्स क्लिक करून):
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी/स्थानिक संस्थेत कायमस्वरूपी नोकरी करत नाही किंवा निवृत्तीवेतन घेत नाही.
- कुटुंबातील केवळ १ विवाहित व १ अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
- प्रक्रिया पूर्ण
👉 शेवटी “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (eKYC) मधील प्रमुख अडचणी आणि उपाय | Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc Problem
1. ई-केवायसी करताना ओटीपी मिळत नाही किंवा “ओटीपी पाठवता येत नाही” असा मेसेज येतो.

कारण: योजनेच्या खूप जास्त महिला लाभार्थी वेबसाइट वापरत असल्याने सर्वरवर खूप गर्दी आहे, विशेषतः ई-केवायसी नुकतीच सुरू झाल्यामुळे सर्वर डाउन असते.
उपाय:
रात्री ११ नंतर किंवा सकाळी ६ पूर्वी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यावेळी सर्वरवरील गर्दी कमी असते. किंवा काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा. Ladki Bahin Yojana e kyc Online Apply महाराष्ट्र link ekyc
2. जून, जुलै, ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत:
अडचण: ज्यांचे हप्ते जून महिन्यापासून बंद झाले आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाहीत
उपाय:
तुम्हाला योजनेच्या ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. Ladki Bahin Yojana ekyc
जर तुम्ही पात्र ठरलात, तर तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्टचे थांबलेले सर्व पैसे एकत्र मिळतील. Ladki Bahin Yojana Hafta
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याची खात्री दिली आहे.
3. आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही.

अडचण: आधार नंबर टाकल्यावर “तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही” असा मेसेज येते.
अर्थ: याचा अर्थ तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana ekyc) काढण्यात आले आहे आणि तुम्ही अपात्र ठरला आहात.
कारणे (तुम्ही अपात्र का असू शकता): तुमच्या घरात चारचाकी वाहन असू शकते, कोणी आयकर (Income Tax) भरत असेल किंवा एकापेक्षा जास्त लाभार्थी महिला असू शकतात.
परिणाम: अशा परिस्थितीत तुमची केवायसी KYC होणार नाही आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
4. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास (उदा. ते हयात नसतील तर):
अडचण: ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारला जात असेल आणि ते हयात नसतील किंवा त्यांचा आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर.
उपाय:
यासाठी सरकारने अजून कोणताही खास पर्याय दिलेला नाही,
सरकार यावर विचार करत आहे आणि लवकरच तांत्रिक टीमकडून पर्याय उपलब्ध केला जाईल.
ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार कार्ड आहे, ते ते क्रमांक टाकून केवायसी (Ladki Bahin Yojana ekyc) करू शकतात, इतरांना नवीन पर्याय येईपर्यंत थांबावे लागेल.
5. कोणाचा आधार क्रमांक टाकावा (पती/वडील):
उपाय:
जर तुमच्या आधार कार्डवर (Aadhar Card) वडिलांचे नाव असेल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका.
जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल, तर पतीचा आधार क्रमांक टाकून केवायसी करा.
6. निवृत्ती वेतनचा पर्याय (सरकारी कर्मचारी) – ‘होय’ किंवा ‘नाही’ निवडणे:
अडचण: ई-केवायसी करताना निवृत्ती वेतन (सरकारी कर्मचारी) च्या पर्यायाबद्दल गोंधळ आहे, प्रश्न स्पष्ट नाही.
उपाय: ‘होय’ किंवा ‘नाही’ काहीही निवडल्यास फारसा फरक पडणार नाही, तुमचा आधार क्रमांक आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधार क्रमांकावरून सरकारी कर्मचारी कोण आहे किंवा कुटुंबात किती सदस्य आहेत याची माहिती मिळेल.
यात काही बदल झाल्यास नंतर कळवले जाईल.
7. विवाहित/अविवाहित डिक्लेरेशन (घरातील महिलांची संख्या):
उपाय: डिक्लेरेशनमध्ये ‘विवाहित एक’ आणि ‘अविवाहित एक’ या पर्यायांमध्ये (पर्याय क्रमांक २):
जर घरात एकच महिला असेल, तर ‘होय’ YES निवडा .
घरात दोनपेक्षा जास्त महिला असतील, तर ‘नाही’ NO निवडा .
लक्षात ठेवा, जर तुम्ही ‘नाही’ निवडल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता.
8. ई-केवायसी ची अंतिम तारीख: Ladki Bahin Yojana ekyc Last Date
मुदत: ई-केवायसी Ekyc करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे (सप्टेंबर आणि ऑक्टोबर).
अंतिम तारीख: नोव्हेंबर महिन्यातील साधारणपणे १८ तारखेपर्यंत हे फॉर्म भरले जातील, त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया बंद केली जाईल. शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला आहे.
9. योजना बंद करायची असल्यास:
उपाय: जर तुम्हाला लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana ekyc) बंद करायची असेल, तर ई-केवायसी करू नका. ई-केवायसी न केल्यास तुमचे योजनेचे पैसे येणे बंद होईल आणि योजना आपोआप बंद होईल.
Ladki Bahin Yojana Faqs
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे का आवश्यक आहे?
योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थींना त्यांचे हप्ते नियमित मिळावेत यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत काय आहे?
सरकारने सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेची जर ई-केवायसी केली नाही तर काय होईल?
जर तुम्ही विहित मुदतीत ई-केवायसी केली नाही, तर योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
ई-केवायसीसाठी मुख्यत्वे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) लागतात.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कुठे आणि कशी करायची?
तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करू शकता किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर मदत घेऊ शकता.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Ladki bahin kyc
Kyc labharthi chunav nodi ghali
Ladki behen yojna ke pese aani rahe hai
June July Aug paise yet nahi
Muje bhi June, july august ka hafta nahi aya hea mumbai
Patra asun pan 13 va 14va hapta nahi bhetla
Error problem a raha hai OTP ka
Mazya vadlakadchi jat VJNT ahe. Ani me love marriage kele ahe .mazya mister chi jat SC ahe tar me konta pravarg nivtu.jat sati
Je tumcha Caste certificate ver ahe
Kyc success zali aahe pn edit kashi karaychi
Ani edit karta yeil ka.edit kashi karavi te saanga
Nahi
Me ekyc keli aahe.pan maze mr ani vail donhi hyat nahit tar mag yasathi kyc grahya aahe ka
Arj kartani jo aadhar card madhe middle name aje tynacha aadhar card number lagel
Renukabai nagorao kandewad
Amhala ekyc chi link ali pn sarvar daun dakhvat ahe
try after 11 pm
ekyc Krna he
EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची/पतीची माहिती द्या. ….ye error aa raha hai , wife ka otp daalne se pehle hi ye warning aari hai
Mazyakdun chukun 1 vivahit ani 1 avivahit hya option la nahi as select kelya gel. Tr mazya paise nahi aale kahi paryay asel tr sanga plz.