लाडकी बहीण योजनेचा GR आला: या महिलांना मिळणार दुप्पट हप्ता, लगेच तपासा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana August Installment Update: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांच्या जीवनात सुख आणि समाधान आणण्यासाठी सुरू करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
आतापर्यंत, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापर्यंतचे 13 हप्ते त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहेत. आता सर्व महिला ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच संदर्भात, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल राज्य सरकारने एक महत्त्वाचा सरकारी निर्णय (GR) जारी केला आहे, ज्यामध्ये खालील माहिती देण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App


ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana August Installment

Ladki Bahin Yojana New Update today in Marathi


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात, जे थेट त्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात जमा होतात.

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला असला तरी, अद्याप ऑगस्टचा हप्ता मिळाला नव्हता.

मात्र, सरकारने नुकताच अधिकृत जीआर प्रसिद्ध केला आहे. या जीआरमध्ये योजनेसाठी ₹3960 कोटींपैकी ऑगस्ट महिन्यासाठी ₹344 कोटी संबंधित महिला व बालविकास विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे, येत्या चार ते पाच दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल.

या महिलांना मिळणार ₹3000 Ladki Bahin Yojana 3000 Installment

Ladki Bahin Yojana September Payment Date,


ज्या महिलांना जुलै महिन्याचा ₹1500 चा हप्ता काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा अर्जाच्या पुनर्-तपासणीमुळे मिळाला नाही, अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील.त्यामुळे, त्यांच्या बँक खात्यात एकूण ₹3000 जमा होतील.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला विलंब का झाला? Ladki Bahin Yojana New Update marathi


या महिन्यात हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबामागे काही प्रमुख कारणे आहेत:

  • गैरप्रकारांची चौकशी: या योजनेत काही गैरप्रकार उघड झाले आहेत. यामध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा अपात्र पुरुषांनीही लाभ घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
  • अर्जांची तपासणी (स्क्रूटनी): अशा सर्व गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी, सध्या 26 लाखांहून अधिक महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. याच कारणामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला.


₹1500 की ₹500?

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, किंवा ज्यांना ‘नमो शेतकरी योजने’अंतर्गत वर्षाला ₹12,000 मिळतात, अशा महिलांना फक्त ₹500 देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तसेच, ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज दाखल केला, त्यांचे अर्ज रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली जात आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

9 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा GR आला: या महिलांना मिळणार दुप्पट हप्ता, लगेच तपासा”

Leave a Comment