Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025
Pink E Rickshaw Scheme Maharashtra: राज्य शासन प्रत्येक नागरिकांसाठी राज्यात काही योजना राबवत असते, राज्य शासनाने मागील काही काळात महिलांसाठी खूप साऱ्या योजना राबवलेल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, रोजगारसाठी लाडका भाऊ योजना राबवल्या आहेत. आता महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागातर्फे राज्यातील गरजू 10000 दहा हजार महिलांना रोजगाराच्या संधी मिळावा यासाठी “पिंक ई रिक्षा” वाटप करण्यात आलेला आहे. Pink E Rickshaw Yojana in Marathi
तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळणार व कसा अर्ज दाखल करावा Pink e rickshaw Yojana Online Registration, तर याबद्दल बघूया संपूर्ण माहिती सविस्तरपणे ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणीसाठी शासनाने आणखी एक गिफ्ट | Pink E-Rickshaw Yojana 2025

ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील गरीब व गरजू महिलांना महिन्याला १५०० रुपये मानधन शासनातर्फे देण्यात येते.
तसेच महिला सशक्तिकरण व त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कमी दरात पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेची नागपूर येथे सुरूवात करण्यात आली, या योजनेमध्ये राज्यातील एकूण ८ जिल्ह्यातील महिलांना १०,००० पिंक ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे.
याच्या अंतर्गत नागपूर शिवाय पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पिंक ई रिक्षाच्या एकूण किंमती पैकी 20% टक्के अनुदान राज्य शासन देणार असून, १०% टक्के रक्कम लाभार्थी महिलांनी द्यायची आहे, उर्वरित 70% टक्के रक्कम सवलतीच्या दरात व्याजावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले.Pink E Rickshaw Yojana Maharashtra
लाडकी बहीण योजनेच्या धरतीवर पिंक ई रिक्षा योजना : मुख्यमंत्री

ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणासाठी या योजनेच्या फायदा राज्यातील महिलांना झाला.
तसेच पिंक ई रिक्षा माध्यमातून राज्यातील महिलांना त्यांच्या रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्वतःच्या पाया वर उभे राहण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. Pink e Rickshaw Yojana in Marathi
पिंक ई रिक्षा माध्यमातून महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक साधन मिळेल, तसेच रात्री महिलांना पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिर ू शकता. असा उद्देश या योजनेमागे असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पिंक ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या वितरणात नागपूर 11000 अर्ज आले होत, त्यामध्ये २००० हजार महिलांना पिंक ई रिक्षा दिल्या गेल्या.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.