Ladka Bhau Yojana Document List | लाडका भाऊ योजनेसाठी ‘ही’ कागदपत्रे हवीच
Ladka Bhau Yojana 2024 Online Apply :महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण तरुणीसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना ची घोषणा केली आहे त्याचे नाव मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, या योजनेचे नाव अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे ठेवले आहेत तरी या योजनेद्वारे राज्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणीसाठी कार्य प्रशिक्षण सहा महिने त्यांना दिले जाईल व त्यांना योग्य याच्या मोबदला पण दिला जाईल|
लाडका भाऊ योजनेमध्ये योग्य उमेदवाराला योग्य ते काम देऊ व त्याचे कौशल्य देऊन त्याच्या आत्मविश्वास व स्वावलंबन केले जाईल. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
या कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी 6 महिने असेल आणि या कालावधीसाठी सुशिक्षित तरुण-तरुणीना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. हे विद्यावेतन लाभार्थी तरुणाच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
घटक | तपशील |
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | सुशिक्षित बेरोजगार युवा |
वर्ष | २०२४ |
उद्दिष्ट | उमेदवारांना उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) प्रदान करून रोजगारक्षम बनवणे. |
आर्थिक तरतूद | ₹5,500 कोटी |
इंटर्नशिप कालावधी | 6 महिने |
विद्यावेतन | शासनाकडून देण्यात येणार, थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल |
इंटर्नशिप संधींची संख्या | दरवर्षी सुमारे 10 लाख |
उमेदवार पात्रता | 1. वय: 18 ते 35 वर्षे 2. किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर 3. महाराष्ट्राचा रहिवासी 4. आधार नोंदणी 5. आधार संलग्न बँक खाते 6. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी |
आस्थापना/उद्योजक पात्रता | 1. महाराष्ट्रात कार्यरत असावे 2. कमीत कमी 3 वर्षे स्थापन झालेले असावे 3. आवश्यक नोंदण्या: EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT, उद्योग आधार4. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी |
ऑनलाइन नोंदणी | उमेदवार आणि आस्थापना दोघांसाठी निर्दिष्ट महास्वयम पोर्टलवर उपलब्ध |
फायदे | 1. उमेदवारांसाठी प्रत्यक्ष कार्यानुभव 2. रोजगार क्षमता वाढते 3. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते |
अधिक माहिती | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध |
लाडका भाऊ योजनेत कोणाला करता येणार अर्ज
- लाडका भाऊ योजनेमध्ये अर्ज करणारा उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा,
- तो महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- योजनेमध्ये बारावी पास, आयटीआय, पदवीका, पदवी व पदवीधर शिक्षण धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवाराला महास्वयम या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून त्याला योग्य ते कौशल्य शिक्षण दिले जाईल.
माझा लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक आधार कार्ड लिंक
- रहिवास प्रमाणपत्र
- महास्वयम या पोर्टलवर नोंदणी करून तेथील एम्प्लॉयमेंट कार्ड ची प्रत
- लाडका भाऊ योजनेच्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा डिग्री व पदव्युत्तर याचे सर्व सर्टिफिकेट असावी
- याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.