Where will the girl child get Rs 2100 from under the scheme, Chief Minister Devendra Fadnavis
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा काल 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी होताच मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. (Ladki Bahin Yojana)
या बैठकीमध्ये काय मोठे निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं फडणवीस म्हणाले. तसेच, राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजना यापुढेही सुरु राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? When will I get money under Ladki Bahine Yojana?
यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’बाबत माहिती दिली. राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजेनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 देण्याची घोषणा केली होती. आता महायुतीचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे सरकार या घोषणेबाबत पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
यासंबंधी प्रश्न केला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकतीच मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीनं डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. (Ladki Bahin Yojana)
‘त्या’ घोषणा महायुती पूर्ण करणार?
मी पूर्वी जेव्हा सीएम होता तेव्हा मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो, आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वत: डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो असंही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणांचा पाऊस पाडला होता. त्यात शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजार वरुन 15 हजार वाढ, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरुन 2100 रुपये दिले जाणार, 25 लाख रोजगार निर्मिती, वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. आता या घोषणांची अंमलबजावणी कधी होईल, त्याकडे सर्वांची नजर असेल.
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार; Ladki bahin yojana 2100 rupees
लाडकी बहीण योजना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत आणि त्यामध्येच लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये दिले जाणार आहेत.लाडकी बहीण योजना ही भविष्यात बंद केली जाणार नाही तर त्यामध्ये वाढ केली जाईल परंतु 2100 रुपये देत असताना बजेटच्या वेळेस याविषयीची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेत ही वाढ केली जाईल.
लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ करत असताना सर्व आर्थिक स्त्रोतांची माहिती तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील त्यामुळे 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे आणि जे आश्वासने दिली केली आहेत त्यांची पूर्तता केली जाईल.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.