Ladki Bahin Yojana 6th Installment 1500 rupaye Release Update
Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेत. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात. लाडकी बहिण योजना देखील सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामुळे आता महिलांच्या माध्यमातून या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
2100 rupaye kadhi pasun yenaar 2100 रुपये हप्ता कधीपासून येणार
लाडकी बहिण योजनेसाठी महत्त्वाचे म्हणजे आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आमच्या सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपयाचा लाभ देऊ असे म्हटले होते. यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित झाले असल्याने महिलांकडून आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न विचारला जातोय. राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पात विचार केला जाईल असे म्हटले आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो.
लाडकी बहिण योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून हा थकीत लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
6th hapta 1500 kadhi yenaar 6 व्या हप्ता 1500 रुपये कधी येतील
लाडकी बहिण योजनेसाठी आता डिसेंबरचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाणणी बाकी होती, त्या प्रक्रियेला देखील आता वेग आला आहे. त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत. नक्कीच येत्या दोन-तीन दिवसात जर डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले तर हा लाभ महिलांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
अर्जांची छाननी होणार की नाही?
या अर्जांची छाननी होणार का, या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या, सर्व अर्जांची छाननी झाली आहे. मात्र एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी करण्यात येईल. मी महिला व बालविकास मंत्री होते, त्यावेळी माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. आता नव्याने काही तक्रारी आल्या असतील तर मला माहीत नाही. मात्र तक्रारी आल्या असतील तर त्या अर्जांची छाननी होईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
आदिती तटकरे काय म्हणाल्या? What should Aditi Tatkare say?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. तसेच सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात दोन तिन दिवसात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.