'लाडकी बहीण' अर्जाची मुदत वाढवली, आता कधीपर्यंत आणि कुठे भरता येणार अर्ज? जाणून घ्या

: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली.

या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन शासनाकडून त्यांच्या बँक खात्या जमा करणार आहेत.

या योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर पर्यंत शासनाने वाढविली होती, पण आता खूप सारे महिलांची अर्ज पेंडिंग आहेत, खूप साऱ्या महिलांनी अर्ज रिजेक्ट झाले आहे, तर काही महिलांना अर्ज आतापर्यंत भरले नाही .

अशा महिलांसाठी खुशखबर आहे,त्यांच्यासाठी शासनाने नवीन तारीख वाढवून दिली आता जाणून घेऊया लाडकी बहिणीची वाढविली तारीख

 लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी अर्ज केले आहे व त्यांना जुलै ऑगस्टमध्ये पैसे मिळाले नाही  . त्यांचे अर्ज पात्र झाले अशा महिलांना ऑक्टोबर मध्ये एकूण 7500 एकत्रित मिळणार आहे

सप्टेंबर महिन्यात चार हजार पाचशे रुपये मिळाले अशा मुलांना ऑक्टोंबर मध्ये 4 आणि 5वा हप्ता मिळून 3000 रुपयांच्या हप्ता मिळणार आहे.

काही महिलांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग व भरण्यासाठी बाकी असल्यामुळे सरकारने त्यांचे मागणी ऐकले आहे,  लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर पर्यंत सरकारने मुदत वाढ  दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज आतापर्यंत भरले नाही अशा लाभार्थींना महिलांना लवकरात लवकर अंगणवाडी केंद्र किंवा ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरू शकता.

लाडकी बहिण योजना : ही “4” कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागणार |Ladki Bahin Yojana Document List In Marathi