Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Official Website Full Process
लाडकी बहीण योजना ला एक महिना उलटला असून आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 80 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत app भरलेला आहे.
नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या समस्याना समोर जावे लागत आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन Website पोर्टल सुरू केलेले आहे
नवीन अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहे, नंबर वर ओटीपी येऊन नंबर व्हेरिफाय करायचा आहे.
लॉगिन केल्यावर आपले नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे, सर्व संपूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, नगरपरिषद/महानगरपालिका ही सर्व माहिती भरायची आहे.
कागदपत्रे अपलोड करा ऑप्शन मधे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र/ 15 पूर्वीचे राशन कार्ड/ मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याच्या दाखला या पैकी कोणताही एक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
हमीपत्र च्या बॉक्स वर टिक करायची आहे आणि सर्व बाबी स्वीकार करायचे आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही जास्त कागदपत्र लागणार नाही. नंतर तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करा.
अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्ज तिथे तुम्ही पाहू शकता. तिथे आपल्या अर्जाच्या स्टेटस पण बघू शकता.