Ladki Bahin Yojana March 1500 Installment Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनांमध्ये सध्या केवायसी प्रक्रियासाठी महिला व बाल विकास विभागाने मुदतवाढ दिलेली आहे ही मुदतवाढ आता 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्ती किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
लाडकी बहीण योजनेमध्ये नुकताच हे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या 28 तारखेला वितरित करण्यात आला होता परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपून सुद्धा मार्च महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना येणार बद्दल आपण सविस्तरपणे माहिती पाहूया. Ladki Bahin Yojana March 1500 Installment Update

Ladki Bahin Yojana March hapta update
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडक्या बहिणींना 1500 कधी मिळणार
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत परंतु मार्च महिन्याचा हप्ता अजूनही पात्र महिलांच्या बँक खाता जमा झालेला नाही.
मागील काही महिन्यापासून सतत हप्ता हा पुढील महिन्याच्या पंधरा तारखेनंतरच दिला जात आहे म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जात आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा ओलांडून सुद्धा मार्च महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्णपणे झालेली आहे आणि आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते ज्या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत त्या महिलांना आशा लागले की मार्च महिन्याचा हप्ता कधी येईल मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता हा नेहमीप्रमाणेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो.

या महिलांना 1500 मिळणार नाहीत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ही केवायसी प्रक्रियेसाठी 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे.
ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये काही दुरुस्ती किंवा त्रुटी आहेत त्यांनी मुदत संपण्याच्या अगोदर आपली केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती किंवा प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा मे महिन्याच्या सुरुवातीपासून ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषाच्या बाहेर आहेत किंवा ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्या महिलांचा 1500 रुपये चा हप्ता हा बंद होऊन त्या महिला या योजनेतून अपात्र ठरवल्या जातील.
अपात्र महिला कोणत्या कारणास्तव होणार
1.ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या महिला अपात्र होतील.
2.ज्या महिलांनी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करून घेतलेले नाही त्या महिला पण अपात्र होतील.
3.ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते आपण महिला अपात्र होतील.
- ज्या महिलांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त असेल त्या महिला पण अपात्र होतील.
5.ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु अन्य राज्यातील सरकारी योजनेचा पण लाभ घेता येत अशा पण महिला या योजनेतून अपात्र होतील.
6.ज्या महिलांनी अर्ज भरताना आपले नाव चुकीचे किंवा आधार क्रमांक किंवा बँक पासबुक मधील माहिती चुकीची भरलेली आहे त्या महिला पण या योजनेतून अपात्र होतील.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.