Ladki Bahin Yojana New Update: मुख्यमंत्री माझी लाडकी काही योजना राज्य शासनाची एक महत्वकांशी योजना आहे, ही योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे. या अंतर्गत पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना १५०० रुपये हप्ता प्रत्येक महिन्याला मिळत आहे.
योजना सुरू करताना राज्य शासनाने या योजनेमध्ये काही निकष निश्चित केले होते, पण काही महिलांनी या निकषा बाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतला आहे.
त्यामुळे आता तब्बल 22,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची बातमी समोर येत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या जिल्ह्यातील 22 हजार महिलांचे अर्ज वगळण्यात आले | Ladki Bahin Yojana Apatra Yadi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राज्य शासनाने अर्ज भरतांना महिलांना साठी काही निकष निश्चित केले होते. या शासन निर्णय मध्ये सर्व निकष सविस्तरपणे सांगण्यात आले होते.
तरीपण काही महिलांनी निकषा बाहेर जाऊन या योजनेच्या फायदा घेतला असल्याचे समोर आले आहे .
माहितीनुसार मुंबई सह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू होणार आहे, ज्या कुटुंबातील महिलांच्या नावाने चार चाकी कार आहे किंवा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.अशातच आता अर्ज पडताळणी मध्ये मुंबईतील 22000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
घरोघरी जाऊन होणार पडताळणी | Ladki Bahin Yojana Form Cheaking

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे अर्ज व्यवस्थित निकषांमध्ये भरले आहे की नाही याबद्दल लाभार्थी महिलांची अर्जाची पडताळणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाल विकास प्रकल्पधिकारी, पर्यावेक्षिका आणि अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे, ज्या महिला अपात्र ठरत असल्यास तिला योजनेतून वगळण्यात येणार आहे, आता आगामी काळातही अनेक महिलांना यातून वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Paisa nahi mila