Bima Sakhi Yojana Kya Hai | Bima Sakhi Yojana Apply Online 2025
What is Bima Sakhi Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरियाणा येथे आज देशातील महिलांसाठी एक नवीन योजना ची सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत देशातील महिलांना आर्थिक रित्या स्वतंत्र, स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी या योजनेच्या लॉन्च केला आहे. या योजनेच्या नाव सरकारने “विमा सखी योजना” असे ठेवले आहे.
या योजनेत भाग घेणाऱ्या महिलांना “विमा सखी” असे संबोधले जाणार आहे. तर या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रतिमाह 7,000 असे मानधन सरकारतर्फे देण्यात येणार आहे, तर आपण जाणून घेऊया बिमा सखी योजना बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये तर हा लेख शेवटपर्यंत वाचण्याची कृपा करावी.
विमा सखी योजना काय आहे | What is Bima Sakhi Yojana LIC
देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र शासनाने नवीन विमा सखी योजना ची लॉन्च केले आहे, योजने अंतर्गत महिलांना आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे आणि यासाठी त्यांना मदत करायची आहे.
या योजनेअंतर्गत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही योजना राबवत असून इच्छुक उमेदवाराला सुरुवातीला 3 वर्षे एलआयसी तर्फे ट्रेनिंग दिली जाणार आहे.
याद्वारे त्यांना या योजनेबद्दल सर्व माहिती सखोलपणे समज दिली जाणार आहे, तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजून देण्याची पद्धत शिकवली जाणार आहेत या ट्रेनिंग काळात महिलांना मानधन सुद्धा देण्यात येणार आहे. ट्रेनिंग नंतर या महिलांना एलआयसी विमा एजंट रूपात काम करु शकतील, या योजनेअंतर्गत पदवी पास असलेल्या महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळू शकेल.
Bima Sakhi Yojana LIC All Details
योजना | माहिती |
---|---|
योजना | केंद्र सरकार |
योजना सुरुवात | 9 डिसेंबर 2024 ( हरयाणा) |
योजनेचे नाव | विमा सखी योजना |
उद्दिष्ट | महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे |
प्रमुख संस्था | एलआयसी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन) |
मानधन | पहिल्या वर्षी ₹7000/महिना, दुसऱ्या वर्षी ₹6000/महिना, तिसऱ्या वर्षी ₹5000/महिना |
ट्रेनिंग कालावधी | 3 वर्षे |
पात्रता | महिला, वय 18-70 वर्षे, दहावी पास |
काम | महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहित करणे व मदत करणे |
फायदे | एजंट म्हणून कामाची संधी, डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची शक्यता |
अर्ज करण्याची प्रक्रिया | एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज |
महत्त्वाची लिंक | एलआयसी अर्ज लिंक |
विमा सखी योजना ची पात्रता काय आहे | Bima Sakhi Yojana Eligibility
- विमा सखी योजना फक्त महिलांसाठी आहे .
- महिला कडे दहावी पास असल्याचे असावे प्रमाणपत्र असावे.
- महिलाचे वय 18 ते 70 या दरम्यान असावे.
- तीन वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर महिला विमा सखी म्हणून काम करू शकतात.
विमा सखीला काय काम करावे लागणार | Bima Sakhi Yojana Online Application
विमा सखी योजनेअंतर्गत पात्र महिलांना एलआयसी तर्फे तीन वर्ष ट्रेनिंग देण्यात येणार आहे, ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या भागातील महिलांचे विमा काढायचे आहे.
एलआयसी तर्फे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही एलआयसी एजंट म्हणून काम करू शकता, पण तुम्हाला एलआयसी एजंट चे नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंट ला मिळणार नाही, तसेच ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड होईल त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.
विमा सखी योजनेत किती पैसे मिळणार | Bima Sakhi Yojana Payment
विमा सखी योजनेअंतर्गत पात्र विमा सखींना तीन वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर ते या कामासाठी पात्र ठरणार आहेत.
तसेच त्यांना तीन वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान दोन लाखाहून अधिक मानधन मिळेल, यापैकी पहिल्या वर्षी 7000 रुपये महिना, दुसऱ्या वर्षी ६००० हजार रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे .
यामध्ये बोनस किंवा कमिशनच्या समावेश असणार नाही.
यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे की या महिला एजंट ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसी पैकी 65 टक्के पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय राहायला हव्यात.
विमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा | Bima Sakhi Yojana Online Form
- विमा सखी योजनेत अर्ज करण्यासाठी एलआयसी च्या अधिकृत वेबसाईटवर करू शकता तसेच या लिंक https://agencycareer.licindia.in/agt_req/New_Lead_Sakhi_Candidate_Data_entry_For_NewWeb.php वर जाऊन पण तुम्ही अर्ज करू शकता.
- लिंक ओपन केल्यावर तुम्हाला विमा सखी
- योजनेच्या ऑनलाईन फॉर्म दिसेल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सर्व माहिती भरायची आहे.
- तुम्ही एलआयसी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा एम आर यांच्याशी संबंधित असाल तर त्यांची देखील इथे माहिती द्या
- शेवटी कॅपच्या कोड भरून तुमच्या ऑनलाईन फॉर्म सबमिट करा.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.