Ladki Bahin Yojana July पैसे कधी जमा होणार,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: बनावट लाभार्थींवर कारवाईचे संकेत
Ladki Bahin Yojana New Update today in Marathi : राज्य शासनाची ‘माझी लाडकी बहीण’ योजना राज्यात प्रचंड यशस्वी ठरली आहे, किंबहुना विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळवून देण्यात या योजनेचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले जाते. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत प्रति महिना १५०० रुपये याप्रमाणे १२ हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
योजनेचा उद्देश आणि गैरवापर | Majhi Ladki Bahin Yojana 13 Hafta Update

गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने काही निकष ठरवले होते. मात्र, काही महिलांनी या निकषांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांची नावे योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पुरुषांनीही घेतला लाभ! Ladaki Bahin Yojana new Update
याहून धक्कादायक बाब म्हणजे, केवळ महिलाच नव्हे, तर १४,००० पेक्षा जास्त पुरुषांनीही बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या पुरुषांनी प्रति महिना १५०० रुपये मानधन लाटले आहे. 14 हजार 298 पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ; बोगस भावांनी लाटले 21 कोटी?
अर्थमंत्री अजित पवारांचा इशारा | Ajit Pawar on Ladaki Bahin Yojana new update

या प्रकरणावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या पुरुषांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे वसूल केले जातील.
पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू करताना शासनाने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. या अटी-शर्तींच्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी लाभ घेतला, त्यांच्या अर्जांची पुनर् तपासणी करून त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. पण या योजनेमध्ये काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. ज्या पुरुषांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.”
पुढील पाऊले
या प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाला अधिक कडक नियम आणि पडताळणी प्रक्रिया लागू करण्याची गरज आहे. बनावट लाभार्थींवर होणारी कारवाई इतर संभावित गैरवापर करणाऱ्यांसाठी एक कडक संदेश ठरेल अशी अपेक्षा आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Abhi tak nahi aaya paise 13 hafta July ka
June ka abhi tak nahi mile
Mala ajun july che paise nahi milalet aahet
June ka mahina abhi tak nahi mila