Lek Ladki Yojana 2025 Online Apply
Lek Ladki Yojana 2024 Online Apply: सरकारने महिलांसाठी व मुलींसाठी सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत महिलांना सशक्तिकरण व आर्थिक स्वतंत्रता मिळावी यासाठी शासनाने महिलांसाठी खूप साऱ्या योजना आखलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना, सुकन्या समृद्धी योजना असो की अन्नपूर्णा योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरण व आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास हातभार लागलेला आहे.
त्यामध्ये आणखी भर घालत राज्य शासनाने व केंद्र शासनाने लेक लाडकी योजना राबवत आहे तर बघूया या योजनेबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
काय आहे लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Information in Marathi
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने राबवलेली मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेमध्ये मुलीला तिच्या जन्मापासून ते अठरा वर्षाच्या वयापर्यंत विविध शैक्षणिक टप्प्यावर आर्थिक मदत केली जाते, या योजनेचे मुख्य उद्देश मुलीच्या जन्मदरात वाढ करणे त्यांचे शिक्षण सुलभ करणे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच सामाजिक स्तर वृद्धी करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे | Lek Ladki Yojana 2025
वित्तीय सहाय्य: या योजनेअंतर्गत, मुलीला तिच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.
- जन्माच्या वेळी: ₹5,000
- 1ली इयत्ता: ₹4,000
- 6वी इयत्ता: ₹6,000
- 11वी इयत्ता: ₹8,000
- 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹75,000
शिक्षण:
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देणे या योजनेमुळे मुलीचे शिक्षण सुरक्षित होते व त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळते ज्यामुळे महिलांच्या साक्षरतेत वाढ होते.
आरोग्य व पोषण:
या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदतीमुळे त्यांच्या आरोग्य व पोषणाकडे अधिक लक्ष देणे शक्य होते जे त्यांचे मानसिक व शारीरिक विकासासाठी महत्त्वाचे आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक:
मुलींच्या जन्मदरात वाढ करणे तसेच समाजात मुलीची स्थिती सुधारण्यास योजना मदत करते .18 वर्षापर्यंत आर्थिक मदत मुलींना त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी एक पाया देऊ शकते त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करते.
Lek Ladki Yojana 2025 eligibility
पात्रता: योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी पिवळे किंवा केशरी राशन कार्डधारक असणे आवश्यक आहे. तसेच, ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लागू आहे. (Lek Ladki Yojana Patrata)
उद्देश: मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, त्यांचे शिक्षण सुलभ करणे, आरोग्य आणि पोषण सुधारणे, आणि सामाजिक स्तरवृद्धी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया | Lek Ladki Yojana 2025 Online Apply
ऑनलाइन: अद्याप ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल अधिकृत माहिती https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en उपलब्ध आहे. भविष्यात ही सुविधा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
ऑफलाइन: अर्ज फॉर्म आपण संबंधित अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालयातून मिळवू शकता. आवश्यक कागदपत्रेसह हा फॉर्म जमा करावा लागेल.
Lek Ladki Yojana 2025 Documents | लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पालकांचे राशन कार्ड
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
लेक लाडकी योजना संपर्क आणि अधिक माहिती | Lek Ladki Yojana 2025 Website
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्यासाठी वेबसाइट किंवा हेल्पलाइन वापरू शकता. (Lek Ladki Yojana helpline )
या योजनेची अधिक तपशीलवार माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असू शकते किंवा त्यांच्या संबंधित विभागांशी संपर्क करून मिळवता येते.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
मला लाडकी बहिणी योजना चे जानेवारीचा महिना पैसे नाही आलेत ते कधी येतील का तुम्ही फसवलंय आम्हाला